नागपूर : नागपूर मेट्रोने (Nagpur Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. नागपूर मेट्रोच्या उड्डाणपुलाच्या लिफ्टिंग होलमधून चक्क वाळू (Sand) पडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिलरमधून वाळू पडत असतानाचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यामुळे नागपूर मेट्रोच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागपुरातील इंदोरा चौक ते 10 नंबर पुलीया दरम्यान 107 आणि 108 नंबरच्या पिलरजवळ वाळू पडताना दिसत आहे. वाळू पडल्याने रस्त्यावर ढिगारा निर्माण झाल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे. यापूर्वी सुद्धा नागपूर मेट्रोच्या कामावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून चक्क
वाळू पडतेय, व्हायरल व्हीडीओमुळे नागपूर मेट्रोच्या कामावर प्रश्नचिन्ह. @MetroRailNagpur @CMOMaharashtra @TV9Marathi @NitinRaut_INC pic.twitter.com/7BrmXskBNO— gajanan umate (@gajananumate) April 12, 2022
संबंधित बातम्या :
नागपूर मेट्रो भरतीमध्ये आरक्षण डावलत घोटाळा झाल्याचा आरोप; युवक काँग्रेसचा मेट्रो भवनला घेराव