नागपूर: महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सक्रिय झाले आहेत. कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात आली आहेत. (Nagpur Nitin Gadkari calls president of Mylan India for avail Remedesivir injection Corona patient)
नितीन गडकरी यांच्या विनंतीवरून ‘मायलन इंडीया’ने तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपूरला पोहोचते केले आहेत. लवकरच दुसरी खेप पाठवण्याचे आश्वासनही दिले आहे. मायलन इंडिया ही ‘रेडेसिवीर ‘ इंजेक्शन उत्पादन करणारी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे.
‘कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari यांनी मायलन/’व्हिटारीस इंडीया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) April 12, 2021
नितीन गडकरी यांनी यापूर्वी‘सन फार्मा’चे मालक सिंघवी यांच्याशी बोलणे केले होते. ‘सन फार्मा’मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार डोसचा पुरवठा नागपुरात झाला आहे. उर्वरित डोसेज लवकरच पोहोचवण्याची अपेक्षा आहे. नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.
नागपूरमधील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 2 लाख 84 हजार 258 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 लाख 21 हजार 387 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 58 हजार 507 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 4 हजार 318 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
नागपूर जिल्ह्याचा देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या टॉप टेनमध्ये समावेश आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपूरच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे.नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये गेल्या 10 दिवसांपासून क्षमेतपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागपूरच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आल्याचं चित्र आहे.
संबंधित बातम्या:
व्हेंटिलेटर्स बेड संपले, एका बेडवर दोन रुग्ण, जमिनीवर झोपवून ऑक्सिजन, नागपूरची विदारक स्थिती
नितीन गडकरींचा थेट फार्मा कंपनीच्या मालकाला फोन, नागपुरात एका झटक्यात 10 हजार इंजेक्शन
नागपुरात कोरोनाचा हाहा:कार का उडाला?; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं ‘हे’ कारण
(Nagpur Nitin Gadkari calls president of Mylan India for avail Remedesivir injection Corona patient)