नागपूर : 10 फूट व्यासाची चक्राकार वस्तू पडली. हे नेमकं काय आहे याचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. सॅटेलाईटचा (Satellite) पार्ट आहे का, या विषयीसुद्धा माहिती घेतली जात आहे. चकाकताना दिसलं अस सगळे सांगतात. एखाद्या घरावर पडलं असतं तर नुकसान झालं असत. मात्र तस झालं नाही कुठलीही जीवितहानी नाही. आता त्याचा अभ्यास केला जात आहे. पाच लोकांची टीम बनविली आहे ते माहिती घेत आहेत. काही ठिकाणी गोळे सुद्धा मिळाले त्याचीही माहिती घेत आहेत. त्यानंतर निष्कर्षापर्यंत पोहचू, असं विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सांगितलं. विविध क्षेत्रातील पाच लोकांची टीम (a team of five people) बनविण्यात आली आहे.
राज ठाकरे यांची भूमिका बदललेली आहे. ते सोयीनुसार बदलली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. झेंड्याचे रंग बदललं. त्यानुसार त्यांचा सुद्धा सूर बदलला आहे. हे लोक बघत असतात. त्यानुसार लोकं निर्णय घेतात. बी टीम आहे की नाही या विषयी मी एवढ्या लवकर बोलणे योग्य नाही. पण मिले सूर मेरा तुम्हारा सुरू आहे.
महाज्योती संदर्भात मोठं काम सुरू आहे. ज्या अडचणी होत्या त्या दूर करण्यात आल्या. आता महाज्योतीचं काम वेगाने सुरू आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. अतिवृष्टीवर ते म्हणाले, बिम्स प्रणालीमध्ये अडचणी आहेत. या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मी यासंदर्भात माहिती घेतली. काही अडचणी असतील त्या दूर केल्या जात आहेत. काही टेक्निकल प्रॉब्लेम झाले ते दूर होतील. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते होतील.
चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा गावात आढळला आहे. पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली. प्रशासनाने स्थानिकांशी संपर्क साधत नक्की घटनेची माहिती घेतली. आकाशातून पडलेला हा गोळा नक्की काय याबाबत मात्र चर्चांना उधाण आले आहे. तहसील प्रशासनाने गोळा ताब्यात घेत वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे.