Nagpur Engineer : नागपूरच्या 15 वर्षीय वेदांतला 33 लाख पगाराची ऑफर, जाहिरात कंपनीच्या स्पर्धेत जगभरातील हजार स्पर्धकांना टाकले मागे

| Updated on: Jul 25, 2022 | 2:37 PM

वेदांत दहावीत आहे. तो लॅपटॉप आणि मोबाईलवर अधिक राहत असल्यानं त्याच्या वडिलांनी लॅपटॉप आणि मोबाईल लपवून ठेवला. मात्र, रात्री घरचे झोपल्यावर तो अभ्यासासोबत लॅपटॉपवर सॉफ्टवेअरसंबंधी काम करायचा.

Nagpur Engineer : नागपूरच्या 15 वर्षीय वेदांतला 33 लाख पगाराची ऑफर, जाहिरात कंपनीच्या स्पर्धेत जगभरातील हजार स्पर्धकांना टाकले मागे
जाहिरात कंपनीच्या स्पर्धेत जगभरातील हजार स्पर्धकांना टाकले मागे
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : नागपुरातील 15 वर्षीय मास्टर वेदांत देवकाते (Vedanta Devkate). मध्यम वर्गीय कुटुंबातील वेदांत कुशाग्र बुद्धीचा आहे. वेदांतची आई सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत तर, वडील इलेक्ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक आहे. वेदांतने संगणकाचे धडे त्याच्या आईकडून घेतले. लॉकडाऊन काळात आई ऑनलाईन क्लासेस घ्यायच्या. आई शिकवत असताना तो डोकावून बघायचा. विचारायचा आणि त्यातूनच त्याला संगणक आणि सॉफ्टवेअरबद्दल आवड निर्माण झाली. त्याने स्वतःची एक वेबसाईटवर सुद्धा तयार केलीय. अमेरिकेच्या न्यू जर्सी (New Jersey, USA) येथील इन्फोलिंग्ज (Infolings) या जाहिरात कंपनीने सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासंदर्भात एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत वेदांतने भाग घेतला आणि देशभरातील 1 हजार सहभागी स्पर्धकांपैकी पहिला क्रमांक पटकावला. कंपनीने त्याला 33 लाख वर्षीय पगाराच्या नोकरीची ऑफर दिली. मात्र, तो केवळ 15 वर्षाचा असल्याचं कळल्यावर त्याला 18 वर्षांनंतर तू कंपनी जॉइन करू शकतोस असं कळविले.

आईकडून मिळाले सॉफ्टवेअर, कोडिंगचे धडे

वेदांत दहावीत आहे. तो लॅपटॉप आणि मोबाईलवर अधिक राहत असल्यानं त्याच्या वडिलांनी लॅपटॉप आणि मोबाईल लपवून ठेवला. मात्र, रात्री घरचे झोपल्यावर तो अभ्यासासोबत लॅपटॉपवर सॉफ्टवेअरसंबंधी काम करायचा. त्यातून त्याचा अनुभव अधिक वाढत गेला. त्याने लॅपटॉपचा चांगल्या कामासाठी उपयोग केला. त्यातूनच त्याने इतकी मोठी उपलब्धी कामविल्याचं त्याचे वडील प्रा. राजेश देवकाते यांनी सांगितलं. वेदांतची आई सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यांच्याकडून वेदांतला संगणक, सॉफ्टवेअर, कोडिंग याचे धडे मिळाले. आईचं काम बघून त्याचा संगणकाबद्दल आवड निर्माण झाली. त्याने स्वतःचं ऑनलाइन कोर्सेस केले आणि त्यातूनच तो या विषयात निश्नात झाला. अशी माहिती त्याची आई प्रो. अश्विनी देवकाते यांनी दिली.

वय कमी असल्याने ऑफर स्वीकारता येत नाही

नागपूरच्या 15 वर्षीय वेदांत देवकाते याला अमेरिकन कंपनीने तब्बल 33 लाख रुपये पगाराची ऑफर दिलीय. वेदांत ने न्यू जर्सी येथील इन्फोलिंग्ज या जाहिरात कंपनीच्या स्पर्धेत जगभरातील एक हजार स्पर्धकांपैकी तो एकमेव विजयी ठरला. मात्र, तो केवळ 15 वर्षाचा असल्याने त्याला ती स्वीकारता आली नाही. सध्या संगणक किंवा मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलं बिघडत चालल्याचा सूर पालकांकडून नेहमी व्यक्त होत असतो. अनेक मुलं संगणक आणि मोबाईलच्या आहारी जाऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. मात्र, वेदांतनं या संगणक आणि मोबाईलचा चांगला उपयोग करत यश मिळवलंय.

हे सुद्धा वाचा