नागपूर : जिल्ह्यातील सावनेर येथे बाईकवर असलेल्या अर्थव काळेचे (वय 17) गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेली बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेली बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. सोबतच जड वाहन शहरातून प्रवेश करत असताना त्यांच्या वेगमर्यादेवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे देखील या अपघाताचा निमित्ताने उघड झाले आहे. ही घटना 3 जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास झाली आहे.
सीसीटीव्हीत दिसत आहे की, एका ट्रकला ओव्हरटेक करताना बाईकस्वाराच्या गाडीला अपघात झाला. अपघात झाल्याने बाईकस्वार खाली कोसळला आणि त्याच्या शेजारुन जाणारा ट्रक त्याच्या अंगावरुन गेला. या अपघातात अथर्व काळे याचा जागीच मृत्यू झाला आहे. सावनेर येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. तपास पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे करीत आहेत.
अकरावती शिकणारा अथर्व घरून फिरायला गेला. मोपेड स्टुटीनं गर्दीच्या ठिकाणाहून जात होता. समोरून येणाऱ्या गाडीला वाचविण्याच्या नादात त्याची गाडी कोळशाच्या दहा चक्का ट्रकवर आदळली. ही घटना राजकमल चौकाअगोदर घडली. या भागात अतिक्रमणाचा विळखा आहे. भगत स्पेशॉलिटी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गाड्याही रोडवरच राहतात. भाजीपाला विक्रेते तसेच इतर दुकानदारही येथे गर्दी करतात. विशेष म्हणजे रिंगरोडचा फेरा टाळण्यासाठी ट्रकचालक शार्टकटचा वापर करतात. पोलीस बघ्याची भूमिका घेतात.
सीसीटीव्ही फुटेजचा थरारक व्हिडीओ