नागपूर : हैदराबादवरून (Hyderabad) आलेल्या दोन गांजा तस्करांना अटक करण्यात आली. हैदराबादवरून मध्यप्रदेशकडे (Madhya Pradesh) गांजा नेला जात होता. 197 किलो गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा पोलिसांना (Crime Branch Police) गुप्त माहिती मिळाली होती. कळमना परिसरात सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. हैदराबादवरून गांजाची खेप घेऊन ते मध्यप्रदेशच्या दिशेने जात होते. दोन आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. राजस्थानातील अशोकसिंग सुधाराम आणि आग्रा येथील मनीष ओमप्रकाश अशी अटकेतील तस्करांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 197 किलो गांजा जप्त केला आहे.
गांजाची खेप घेऊन हैदराबादहून ग्वाल्हेरकडं जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून शनिवारी पोलिसांनी सापळा रचला. दुपारी एकच्या सुमारास एक कार जात होती. कारमध्ये अशोकसिंग आणि मनीष होते. जबलपूर मार्गावर कळमना परिसरात त्यांना ताब्यात घेण्यात आले. कारमध्ये तपासणी केली असता त्यांच्याकडं 197 किलो गांजा आढळला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तो जप्त केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात येत आहे. एनडीपीसी पथकाचे मनोज सिडाम, सुरज सुरोशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या घटनेमुळं नागपुरातील गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
निमलष्करी दलात निवड झाली. पण, सरकारी नोकरी मिळाली नाही. त्यामुळं गेल्या महिनाभरापासून संविधान चौकात आंदोलन सुरू आहे. आता या तरुणांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. नोकरी द्या किंवा आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्या, अशी मागणी या तरुणांनी केली आहे. या आशयाचं पत्र तरुणांनी सीताबर्डी पोलिसांना शनिवारी दिलं. यामुळं पोलिसांवरचं दडपण वाढलंय. संविधान चौकात आंदोलनस्थळी बंदोबस्त वाढविण्यात आलाय. या तरुणांचे समुपदेशन करण्याचं काम आता पोलीस करत आहेत.