नागपूरच्या एका कलाकाराने तान्हा पोळ्यासाठी नंदी बैल (Nandi Bull) बनविला. अडीच लाख रुपये किमतीचा हा नंदीबैल आहे. अखंड लाकडापासून हा नंदीबैल तयार करण्यात आला. यामध्ये एकाच लाकडावर कोरकाम (Finishing) करण्यात आलं. हा सुबक नंदीबैल बनविण्यात आला. कलाकाराने याच्यावर मोठ्या प्रमाणात कलाकारी केली. अगदी हुबेहूब वाटावा असा हा पाच फूट उंचीचा नंदीबैल आहे. पोळ्याच्या दिवशी पोळ्यात आकर्षणाच केंद्र ठरणार आहे. बैलांचा पोळा उद्या, तर परवा तान्हा पोळा आहे. तान्ह्या पोळ्यात बच्चेकंपनी नंदीबैल घेऊन जातात. अशावेळी आकर्षक नंदीबैलाला विशेष बक्षीस (Prize) दिली जातात.
विदर्भात लाकडाच्या बैलांचा पोळा म्हणजेच तान्हा पोळ्याला मोठं महत्त्व असतं. त्यामध्ये लहान मुलं आपल्या नंदीबैल घेऊन तान्हा पोळ्यात दाखल होतात. बक्षीसही मिळवतात. त्यांच्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. मात्र हा नंदीबैल यावर्षीचा आकर्षण ठरेल, असं पाहायला मिळत आहे. त्याची फिनिशिंग सुद्धा कलाकाराने सुबक केली आहे. त्यामुळं त्याची मागणीसुद्धा वाढायला लागली. जीवंत बैलाच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने याची किंमत जास्त आहे. मात्र हा बैल इतका आकर्षक आहे की तो सगळ्यांचे मन मोहून घेत आहे. हा बैल नेमका कशाप्रकारे बनविला ते कारागीर सुभाष बनडेवार यांनी सांगितलं. ते म्हणाले, एका सलग लाकडापासून हा नंदीबैल बनविण्यात आला.
पोळा हा बैलांचा सण. आज आवतण देतो उद्या जेवायला या, असं आवतण आज दिलं जाईल. उद्या पोळा आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ धुतलं जातं. त्यानंतर रंगरंगोटी करून त्यांना झुल पांघरली जाते. बैलांचं डेकोरेशन केलं जातं. त्यानंतर संध्याकाळी आखरावर बैलांचा पोळा भरतो. घरोघरी बैल घेऊन शेतकरी जातात. शेतकऱ्याला बोजारा दिला जातो. पण, सध्या याची क्रेज कमी झाली. पोळ्यापेक्षा तान्ह्या पोळ्याला महत्त्व जास्त आलं.
भंडाऱ्यात लाकडी बैल 300 रुपयांपासून तर 7 हजार रुपयांपर्यंत नंदीबैल मिळतो. लहान मुलाच्या तान्हा पोळ्याची क्रेझ आहे. यात लाकडी बैलाची मागणी प्रचंड वाढते. जिल्ह्यात लाकडी बैलांची आवक एकट्यू मोहाडीतून पूर्ण होते. सुबक व नक्षीकामाने युक्त लाकडी बैल मोहाडीत मिळतात.