नागपूर : नागपुरात आजपासून पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा (heat waves) इशारा देण्यात आलाय. तापमान 45 च्या वर जाणार आहे. त्यामुळे दुपारी ट्राफिक सिग्नलवर (signals) उभे असलेल्या दुचाकीचालकांना उन्हाचे चटके लागतात. त्यामुळे दुपारी 12 ते 4 या उन्हाच्या वेळात नागपुरातील 21 ट्राफिक सिग्नल बंद राहणार आहे. नागपूर ट्राफिक पोलिसांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सिव्हील लाईन्स, (civil lines) सदर, अजनी, बर्डी आणि सोनेगाव परिसरातील सिग्नल दुपारी बंद राहणार आहे. यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळालाय. येत्या दोन दिवसांत पुन्हा नागपूरच्या तापमानात वाढ होणाराय. अशावेळी सिग्नलवर थांबल्यास कडक उन्हाचा सामना करावा लागतो.
उन्हामुळे नागपूरातील २१ सिग्नल दुपारी बंद, वाहतूक पोलीसांचा महत्त्वपूर्ण निर्णय. १२ ते ४ या वेळात ट्राफीक सिग्नल राहणार बंद @NagpurPolice @trafficngp @nagpurcp @Dwalsepatil pic.twitter.com/63QY3hXxPZ
हे सुद्धा वाचा— gajanan umate (@gajananumate) May 5, 2022
सोनेगाव परिमंडळातील काचीपुरा, बाजाजनगर, लक्ष्मीनगर, माता कचेरी येथील सिग्नल दुपारी बंद राहणार. सीताबर्डी परिमंडळातील कन्नमवार चौक, आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, लेडीज क्लब चौक, सायन्स कॉलेज चौक, अहिंसा चौक, येथील सिग्नल दुपारी बारा ते चार बंद राहणार आहेत. कॉटन मार्केट परिमंडळातील आग्यारामदेवी चौक, सरदार पटेल चौक, बैद्यनाथ चौक तर, अजनी परिमंडळातील झोन चार ऑफिस आणि नरेंद्र नगर चौकातील सिग्नल दुपारी बंद राहणार आहेत. याशिवाय इंदोरा चौकातील कडबी चौक, दस नंबर पुलिया व भीम चौकातील सिग्नल दुपारी बंद राहील. अशी माहिती नागपूर शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे.
काल नागपूरचे तापमान 42.4 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलंय. आज सुमारे 43 डिग्री सेल्सिअस तापमान राहणार आहे. उद्यापासून तापमान 44 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. सिग्नलवर थांबावं लागल्यानं उन्हाचा त्रास वाढतो. वाहतूक विभागानं सिग्नलवर न थांबण्याचा हा निर्णय घेतला. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळालाय.