नागपूर : कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लू या आजाराचे या वर्षात एकूण 32 रुग्ण आढळले. यापैकी 27 रुग्ण नागपूर महानगरपालिका हद्धीतील आहेत. 13 रुग्ण शहराबाहेरील आहेत. मागील काही दिवसापासून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. महापालिका साथरोग विभागाकडून (Department of Epidemiology) प्राप्त माहितीनुसार शहरातील वेगवेगळया भागात निवासी असलेले एकूण 32 रुग्णांचा सकारात्मक अहवाल प्रयोगशाळा तपासणीत (Laboratory Report) आढळला. स्वाईन फ्लू हा तसा सौम्य आजार असला तरी जोखमीचे गटातील जसे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा प्रतिकारशक्ती क्षीण असणा-या व्यक्तीमध्ये हा आजार गंभीर स्वरुप धारण करु शकतो. त्यामुळे जीवाला धोका सुध्दा होऊ शकतो. करिता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे (Govardhan Navkhare) यांनी केले आहे.
स्वाईन फ्लूवर खात्रिशीर औषधोपचार उपलब्ध आहेत. लवकर व वेळीच निदान झाल्यास वेळेवर औषध सुरु करता येते. सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फ्लू सदृष्य लक्षणे असल्यास कोव्हिडसोबत स्वाईन फ्लू तपासणी करणे आवश्यक आहे. नागपूर महापालिकेची रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ही तपासणी मोफत केली जात आहे. सध्यास्थितीत शहरात 32 रुग्णाबाबत माहिती मिळाली आहे.
स्वाईन फ्लू, मंकिपॉक्स आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागपूर महापालिकेव्दारे विशेष हेल्पलाईन क्रमांक 9175414355 जारी करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध राहील, असेही मनपाच्या साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले.
हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.
गर्दीमध्ये जाणे टाळा.
स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा.
खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा.
भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी.
पौष्टीक आहार घ्यावा.
हस्तांदोलन अथवा आलिंगन,
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे.