नागपूर : माझ्या काळातच पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, विदर्भात ५० हून अधिक आमदार जिंकण्याचा दावासुद्धा त्यांनी केलाय. विदर्भात २०२४ मध्ये विधानसभेत ५० पेक्षा जास्त आणि ११ ही लोकसभेमध्ये शिंदे-फडणवीस यांच्या समन्वयानं मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही विजय मिळवू, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. पुढच्या विधानसभेत विदर्भात ५० पेक्षा जास्त आमदार निवडून यावेत, अशाप्रकारचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. तसेच विदर्भातील ११ खासदार शिंदे-फडणवीस यांच्या समन्यवयानं निवडून येतील, असंही ते म्हणाले. शिवाय पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशाप्रकारच्या लोकांच्या भावना असल्याचंही बावनकुळे म्हणालेत.
बच्चू कडू म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांची जादू किती चालणार आहे. ते येणारी वेळचं सांगेल. शिंदे-फडणवीस सरकारच्या अडीच वर्षांच्या कामगिरीवर बरचं काही अवलंबून असेल. विदर्भात सर्व खासदार निवडून आणण्याची जादू शिंदे-भाजपची सरकार असल्यामुळं कदाचित असू शकते, असंही कडू यांनी सांगितलं.
२०२४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतील, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. यावर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं की, अशी भविष्यवाणी करण्यात काही अर्थ नसतो. २०२४ मध्ये येणारी परिस्थिती कशी आहे, त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. किंवा प्रहार या लहान पक्षाचापण मुख्यमंत्री होऊ शकतो. आम्हीपण म्हणू शकतो. येणाऱ्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो. पण, याला काही अर्थ नसल्याचंही ते म्हणाले.