नागपूर : सीताबर्डी पोलिसांनी (Sitabardi Police) एका कुख्यात बाईक चोरास अटक केली. हा चोर इतका शातीर दिमाक आहे की तो वेगवेगळ्या युक्त्या लढवत आपलं काम करतो. डुप्लिकेट चाबीच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागातील 12 बाईक चोरल्या. त्याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत. तो बाईक चोरायचा. आपले शौक भागविण्यासाठी पैसे लागतात म्हणून चोऱ्या करायचा. मात्र चोरलेल्या बाईक विक्री केल्यास पकडलं जाऊ शकतो म्हणून त्याने खास युक्ती लढवली. बाईक चोरली की एखाद्याला पकडून ती गहाण ठेवायची. पण कोणी ते करणार नाही म्हणून त्यांना वडिलांना कॅन्सर झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी पैसे पाहिजे म्हणून मला पैसे द्या. याबदल्यात बाईक ठेवा, असं सांगून तो पैसा गोळा करायचा. त्यातून आपले शौक भागवायचा. सीताबर्डी मार्केट (Sitabardi Market) परिसरात या घटना वाढल्या होत्या. पोलिसांनी त्याकडे लक्ष घातलं. हा आरोपी त्यांच्या हाती लागला. अशी माहिती सीताबर्डी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कैलास मगर (Sub-Inspector of Police Kailas Magar) यांनी दिली.
स्वतःचे शौक पूर्ण करण्याकरता मोटार सायकल एक चोर चोरी करायचा. मात्र त्या दुचाक्या गहाण ठेऊन पैसे मिळवायचा. त्यासाठी वडिलांना कॅन्सर असल्याचा बहाणा करायचा. अशा एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने 12 बाईक चोरल्याचं समोर आलंय. चोर आपल्या चोरी लपविण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. मात्र एकदा तो पोलिसांच्या नजरेत आला की त्याच्या युक्त्या कामात येत नाही, एवढं मात्र नक्की.
हा चोर डुप्लिकेट चाबी बनवायचा. त्या चाबीचा वापर करून बाईक चोरी करायचा. बाईक चोरी केल्यानंतर तिला गहाण ठेवायचा. त्यासाठी तो वडिलांना कँसर झाल्याचं सांगायचा. दयामाया ठेवून त्याची चोरलेली बाईक लोकं गहाण ठेवत. पण, त्या पैशातून तो चैन करायचा. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.