गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर : मोठ्या शहरांतील सुमारे ७० टक्के मुलं स्कूल बसने प्रवास करतात. त्यामुळे स्कूल बस चांगल्या अवस्थेत असाव्यात. यासाठी स्कूल बसचालकांना फिटनेस प्रमाणपत्र घेतले जाते. सध्या फिटनेस प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. परंतु, अद्याप काही बस चालकांनी बसचे फिटनेस प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे त्या चालवण्यास योग्य आहेत की, नाही याची खात्री देता येत नाही. नागपूर जिल्ह्यात सुमारे २५ टक्के स्कूल बस या फिटनेसशिवाय रस्त्यावर धावत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या स्कूल बसला धोका झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल निर्माण झाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील 25 टक्के पेक्षा जास्त स्कूल बसेस फिटनेसशिवाय रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवासोबत खेळण्याचा प्रयत्न वाहन चालक करीत आहेत. या स्कूल बसचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे.
नवे शैक्षणिक सत्र या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. त्याआधी स्कूल बसने फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. नागपूर शहरातील जवळजवळ 70 टक्के विद्यार्थी स्कूल बसने शाळेत ये-जा करतात. असं असताना देखील 2 हजार 406 स्कूल बसपैकी 1800 स्कूल बसने फिटनेस प्रमाणपत्र घेतले आहे.
600 पेक्षा अधिक स्कूल बस चालकांनी याकडे दुर्लक्ष केलं असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फिटनेस नसलेल्या वाहनांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास यास जबाबदार कोण ? असा प्रश्न आता विचारला जातोय.
शिवाय फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त वाहन कुठलं हे ओळखायचा कसा हा देखील सवाल आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर स्कूल बस, व्हॅन तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणार असल्याचं उप प्रादेशिक अधिकारी हर्षल डाके यांनी सांगितलं.