नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून राजकीय वादांपासून ते अगदी वैयक्तिक वादापर्यंत प्रकरणं आली आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन प्रचंड गाजत आहे. आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनावरून वाद गाजत असतानाच आता खासदार राहुल शेवाळे यांनी आमदार मनिषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे डी. के. राव गँगशी संबंध असून त्यांनी त्याच्याकडून माजी आमदाराला धमकवून त्याची लूट केल्याचा गंभीर आरोप कायंदे यांच्यावर करण्यात आला आहे.
त्यामुळे शेवाळे-कायंदे वाद आणखी चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे. आमदार मनिषा कायंदे यांनी काल खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात त्यांनी बलात्काराचा, विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
त्यामुळे बलात्कार प्रकरणी आरोप असलेल्या प्रकरणात राहुल शेवाळे यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश नीलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले आहेत.
त्याचप्रमाणे राहुल शेवाळे यानी मनिषा कायंदे यांच्यावरही गंभीर आरोप करत त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे आता ठाकरे गटातील आदित्य ठाकरे यांच्या चौकशीच्या मागणी नंतर आता त्याच्या पुढचा नंबर मनिषा कायंदे यांचा असणार असल्याचे बोलले जात आहे.
खासदार राहुल शेवाळे यांनी मनीषा कायंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी त्यांच्यावर डी. के. राव या गँगशी संबंध असल्याचे सांगितले आहे.
तसेच त्यांनी 2011 मध्ये एका ज्येष्ठ नेत्यासोबत लग्न करून त्यांच्याविरोधातच लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती. त्यानंतर संबंधित नेत्याला ब्लॅकमेल करून घर, वडिलांचा दवाखाना, दुकानाचं लाखो रुपयाचं फर्निचर त्यांनी करून घेतलं असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
राहुल शेवाळे यांच्या विरोधात बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनिषा कायंदे यांनी केल्यामुळेच त्यांच्यावर गंभीर आरोप केले जात असल्याचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
मनिषा कायंदे यांच्यावर आरोप करताना त्यांनी राहुल शेवाळे यांच्यावर दुबईत राहणाऱ्या एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला असल्याचे सांगितले आहे.त्यानंतर त्या तरुणीसोबतचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याचे सांगितले जात आहे.