सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. सत्तेत असूनही भाजपला आता विरोधात बसावं लागणार आहे. १९८५ पासून कर्नाटकची जनता आलटून-पालटून निवडून देते. कर्नाटक निवडणुकीवर अनेकांना भाष्य केलंय. या प्रतिक्रियांमध्ये भर पडली ती समाजसेविका अमृता देवेंद्र फडणवीस यांची. अमृता फडणवीस म्हणाल्या, मला पॉलिटिकल बोलायचं नाहीय. राजकीय बोलायचं नाहीय. पण ही चांगली गोष्ट आहे. हेल्दी गोष्ट आहे. प्रत्येक पार्टीला कर्नाटकची जनता संधी देत आहे. काल आम्ही होतो. आज काँग्रेस आहे. उद्या अजून कोणी राहील. कर्नाटकसाठी चांगली गोष्टी आहे. काही इश्यू नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक निवडणुकीत जाऊनही भाजपला पराभव स्वीकारावा लागला. यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. लोकसभेशी या निवडणुकीचा काही संबंध नाही. लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदी हेच निवडणूक जिंकतील. याचा सर्वांना विश्वास असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.
उद्या मदर्स डे आहे. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मदर्स डे हा खूपच सुंदर असा दिवस आहे. जिच्या हात पाळण्याची दोरी ती जग तारी असे म्हणतात. मला असं वाटतं,आईचं आहे जी पुढचं भविष्य घडवते. कर्तुत्ववान आईला माझ्याकडून आणि सर्वांकडून सलाम.
अमृता फडणवीस या मोजक्या बोलतात. पण, त्या अर्थपूर्ण बोलतात. त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली जाते. कर्नाटक निवडणूक निकालाबाबत बोलायचं नसलं, तरी त्या थोडक्यात बोलल्या. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असल्याचं सांगितलं. त्यानंतर मदर्स डे निमित्त त्यांनी प्रतिक्रिया दिली.