नागपूर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजप माझा पक्ष आहे. पण मी भाजपची थोडीच आहे, असं विधान केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पंकजा मुंडे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. खडसे यांची भेट घेण्यामागचे कारण काय? पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सूचक विधान केलं आहे. प्रत्येक पक्षात इनकमिंग सुरूच असते, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुखांचं हे विधान सूचक संकेत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आता खडसे आणि पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष भेट झाल्यावरच या भेटीत काय निर्णय झाला हे समजणार आहे.
पंकजाताई नाराज आहेत. हे गेल्या काही दिवसांपासून समजतंय. एकनाथ खडसे पूर्वी भाजपात होते. खडसे आणि पंकजाताई यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आज पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे भेट होणार आहे. कुठल्याही पक्षात इनकमिंग असतेच. पण पंकजा ताईबाबत माहीत नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
पंकजा मुंडे यांच्याबाबत प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टाळलं. पंकजा मुंडे भाजपच्या प्रमुख नेत्या आहेत. त्यांनी स्टेटमेंट केलंय. यांचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर बोलण योग्य नाही, असं अजित पवार म्हणाले. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी एका पक्षात अनेक वर्ष काम केलं आहे. असे अनेक नेते एक दुसऱ्यांना भेटत असतात. गोपीनाथ मुंडे यांना खडसे नेता मानत होते. त्यामुळे त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत, असंही ते म्हणाले.
नागपुरात आजपासून दोन दिवस राष्ट्रवादीचं ओबीसी चिंतन शिबीर होणार आहे. भाजपचा गड असलेल्या विदर्भातील ओबीसी मतांवर राष्ट्रवादीचा डोळा आहे. त्यासाठीच हे शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. आज दुपारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शिबीराची सुरुवात होईल. उद्या 4 जून रोजी शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या ओबीसी चिंतन शिबीराचा समारोप होणार आहे.
राजकीय पक्षाकडून विविध सेलचे शिबीरं होत असतात. काही कारणांनी या शिबीराला शरद पवार उपस्थित राहू शकणार नाही. माजी उपाध्यक्ष विधानसभा टेंभुर्णे आणि धानोरकर यांचं दुःखद निधन झाल्याने मी त्यांच्या घरी आज भेट देणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्ष आपापले काम करत असताना वातावरण निर्मिती करावी लागेल. त्यासाठी शिबिर महत्वाच आहे. याचा वेगळा अर्थ नाही. ओबीसी शिबिर आमचं अंतर्गत प्रश्न आहे.
ओबीसी जनगणना झाली नाही त्यासाठी काय कारण आहे, आदी विषयांवर चर्चा होईल. अजून काहींना ओबीसीत टाकण्याचं या राज्यकर्त्यांनी म्हटलंय. ओबीसी घटकांचे आरक्षण काढून घेतल गेलं, त्याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो होतो. ओबीसी जनगणना केल्याशिवाय त्यांना किती आरक्षण दिलं गेलं पाहिजे. पण ते होत नाही, असंही अजित पवार म्हणाले. सांगितलं.