Omicron | नागपुरात ओमिक्रॉनचा दुसरा बाधित!, बालकांच्या राखीव खाटांची गरज पडेल का?

| Updated on: Dec 24, 2021 | 12:12 PM

ओमिक्रॉनच्या दुसऱ्या रुग्णाची नोंद गुरुवारी नागपुरात झाली. या व्हेरिएंटचा संसर्ग वाढल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यावर गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बालरोग तज्ज्ञ टास्क फोर्सची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली.

Omicron | नागपुरात ओमिक्रॉनचा दुसरा बाधित!, बालकांच्या राखीव खाटांची गरज पडेल का?
बालरोग तज्ज्ञ टास्क फोर्सच्या बैठकीत उपस्थित विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे आणि जिल्हाधिकारी विमला आर.
Follow us on

नागपूर : ओमिक्रोनचा (Omicron) संसर्ग वाढल्यास बाधितांपैकी एक टक्का बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते. असा अंदाज बालरोग तज्ज्ञ कृती दलाच्या सदस्यांनी (Pediatric Task Force) वर्तविला. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी बालकांच्या उपचारासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्याचा सूचना दिल्या आहेत.

बालकांच्या उपचारासाठी खाटा राखीव ठेवा

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या विषाणुमुळे बाधित होणाऱ्या काही बालकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक सज्जता ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी कृती दलाच्या बैठकीत दिल्या.

…तर, एक टक्का बालक रुग्णालयात

तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यास बाधितांपैकी एक टक्का बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर बाधित बालकांच्या उपचारासाठी शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्यात. तसेच पुरेशा प्रमाणात औषधी, इतर आवश्यक सामग्री व मनुष्यबळ सज्ज ठेवणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सूचना लवंगारे यांनी दिल्या. तसेच कोविड बाधित बालकांच्या उपचारासाठी आवश्यक औषधींच्या उपलब्धतेसाठी आरोग्य विभागाने समन्वय साधावा, असेही त्यांनी सांगितले.

 

पालकांमध्ये जनजागृती करा

कोविड बाधितांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात दिरंगाई होवू नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बाधित बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियोजन करावे. महापालिकेने बालकांच्या उपचारासाठी शहरात स्वतंत्र सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याकरिता तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता पाठपुरावा करावा, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

 

विद्यापीठ इमारतीमध्ये स्वतंत्र सुविधा

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी जिल्ह्यात कोविड रुग्णालयांमध्ये बालकांवर उपचारासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच कोविड बाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध खाटा व इतर आवश्यक बाबींचा नियमितपणे आढावा घेण्यात येत असल्याचे सांगितले. महापालिकेमार्फत कोविड बाधित मुलांच्या उपचारासाठी विद्यापीठ इमारतीमध्ये स्वतंत्र सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती अपर आयुक्त जोशी यांनी यावेळी दिली.

Agrovision | नागपुरात आजपासून शेतकऱ्यांची पंढरी! चार दिवस अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन, जाणून घ्या कृषीतील आधुनिक तंत्रज्ञान

Nagpur Omicron | ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली, दुसरा ओमिक्रॉनबाधित सापडला; प्रशासन अलर्ट झोनमध्ये

Gondia Saras| सारस पक्ष्यांबद्दल उदासीनता बरी नव्हे! उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना खडसावले; पुढच्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश