सुनील ढगे, Tv9 मराठी प्रतिनिधी नागपूर : वीज बिल वसुलीसाठी वीज कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्यात आली. त्यानंतर त्याला धक्काबुकी करण्यात आली. ही धक्काबुक्की करणे एकाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथडा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. नागपुरातील यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली.
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी थकीत वीज बिल वसुली संदर्भात एकाच्या घरी गेले. त्या ठिकाणी त्यांनी वीज बिल तर दिलं नाही. पण कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. शिवाय कर्मचाऱ्याला धक्काबुकी केल्याचा प्रकार समोर आला.
याप्रकरणी वीज बिल कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि मारहाण करणे या संदर्भातील गुन्हा दाखल केला. अशी माहिती यशोधरा नगरचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी दिली.
विजेचा वापर नागरिक करतात. मात्र त्याचं बिल भरत असताना त्यामध्ये काहीजण टाळाटाळ करतात. अशावेळी वीज कर्मचारी त्याच्या घरी जातो. वीज बिल वसुली करण्याचा प्रयत्न करतात. किंवा त्यांच्या घरची लाईट कापतात.
मात्र याचा परिणाम अनेकदा मारहाणीत होताना दिसतो. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा कर्मचाऱ्यांना समजून घ्यावं. त्यांचं म्हणन ऐकून घेण्याची गरज आहे. अन्यथा असे गुन्हे दाखल होतात. मग, शिक्षा भोगावी लागते.