नागपूर : पैशांची गरज कुणाला नसते. पण, बहुतेक जण मेहनत करून पैसे कमवतात. पण, काहींना कमी वेळात जास्त पैसा हवा असतो. त्यासाठी ते चुकीचा मार्ग निवडतात. अशावेळी त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळत असते. अशीच एक घटना नागपुरात उघडकीस आली. स्वतःवर रुग्णालयात उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. घरी आई आजारी असल्यामुळे उपचारासाठी पैसे लागत होते. त्यामुळे मध्य प्रदेशातील एक युवक चक्क बाईक चोर बनला. त्याने एक दोन नाही तर पाच बाईकची चोरी केली. शेवटी पोलिसांच्या हाती लागला.
नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत रामदासपेठ भागातून एक बाईक चोरी झाली. त्या बाईकचा शोध घेत असताना पोलिसांना एक जण गाडीला धक्का मारत जाताना दिसला. त्याची पोलिसांनी विचारपूस केली असता सगळी कहाणी समोर आली. त्याने पाच बाईक चोरल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी त्याची आगाऊ विचारपूस केली असता सगळा घटनाक्रम समोर आला. आरोपीने अमरावती, वरुड, नागपूर या वेगवेगळ्या भागातून बाईक चोरी केल्या. त्या बाईक विकून तो उपचारासाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला ते महागात पडलं. अशी माहिती सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पीएसआय कैलास मगर यांनी दिली.
युवकाला पैशाची गरज होती. हे खर असलं तरी तो पैसा मिळवण्यासाठी त्याने निवडलेला मार्ग मात्र चुकीचा होता. त्यामुळे आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे. चुकीची काम करालं तर शेवटी त्याचे फळहो तसेच मिळते. याची जाणीव त्याला झाली असणार. पण, पश्च्यातापाशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय त्याच्याकडे शिल्लक राहिला नाही.