नागपूर : कोणाच्या मनात काय असेल काही सांगता येत नाही. धुळ्यातील तरुणी नागपूरमार्गे छिंदवाड्यावरून परतत होती. नागपुरातील एका प्रापर्टी डीलरला तीनं पार्सल आणून देण्यासाठी मदत केली. तो तिला चहा पिण्याच्या बहाण्यानं कारमध्ये घेऊन गेला. कारमध्ये कुकर्म करून शिक्षिकेला सोडून दिले. तिने तक्रार केल्यानंतर प्रॉपर्टी डीलर पसार झाला होता. सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला आता अटक केली आहे.
धुळे येथील एका 23 वर्षीय शिक्षिकेवर नागपुरात अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी इंगोलेनगरातील राजेंद्र विश्वंभर थोरात या प्रॉपर्टी डीलरला अटक केली. पीडित तरुणी धुळे येथे खासगी शाळेत नोकरी करते. एका शाळेत नोकरीची मुलाखत देण्यासाठी ती नोव्हेंबर 2021 मध्ये छिंदवाडा येथे गेली होती. मुलाखत झाल्यानंतर ती नागपूरमार्गे धुळे येथे परत जाणार होती. छिंदवाडा येथील शाळा संचालकाने तिला एक पार्सल देऊन राजेंद्र थोरात यास देण्यास सांगितले. तिने मदत करायच्या उद्देशानं ती पार्सल आणली. नागपुरात आल्यानंतर तिने थोरातला फोन केला. तो कारने बसस्थानकावर गेला. त्याने तिला कारमध्ये बसवून सदर भागात नेले. तिला चहा पाजला. चहा पिताच ती बेशुद्ध झाली. नंतर कारमध्येच त्याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. ही तरुणी धुळ्याला निघून गेली. तेथे शाळा संचालकाला घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच थोरात पसार झाला होता. गुरुवारी त्याला अटक करण्यात आली.
उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार आणि पाच वर्षांच्या दोन चिमुकल्या बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली. बालकांचे शोषण करणारे दोन्ही आरोपीसुद्धा अल्पवयीन आहेत. उमरेड पोलिसांत 6 जानेवारीला रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण घटनाक्रमामुळे पालकसुद्धा हादरून गेले आहेत. मागील काही दिवसांपासून चार आणि पाच वर्षांच्या दोन्ही बालकांसोबत शेजारीच राहणार्या 14 आणि 15 वर्षे वयाच्या बालकांनी अनैसर्गिक कृत्य केले. ही बाब पीडित बालकांनी आपल्या आईला सांगितली. उमरेड पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदविण्यात आली.