Nagpur School | भीक मागा नि फीस भरा! मुख्याध्यापिकेची पालकांना धमकी, शिक्षण विभाग काय कारवाई करणार?

| Updated on: Feb 24, 2022 | 11:37 AM

नागपुरातील सक्सेस पॉईंट स्कूलच्या मुख्याध्यापिकेने एका पालकाला फीससाठी भिक मागायला लावले. भीक मागून शाळेची फीस भरण्यात आली. हे प्रकरण शिक्षण विभागानं गंभीरतेने घेतले. या शाळेवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

Nagpur School | भीक मागा नि फीस भरा! मुख्याध्यापिकेची पालकांना धमकी, शिक्षण विभाग काय कारवाई करणार?
नागपूर जिल्हा परिषद
Follow us on

 नागपूर : शहरातील शताब्दी चौकात रिंग रोडवर सक्सेस पॉईंट स्कूल (Success Point School) आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिकेने पालकांना टीसी दिली नाही. उर्वरित शुल्क आधी भरा, नंतरच टीसी मिळेल, अशी धमकी दिली. पैसे नसतील, तर भीक मागा पण फीस भरा, असं धमकावले होते. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने (z. p. Education Department) घेतली. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. आता शाळेला एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत हे प्रकरण समोर आलं. त्यावेळी या प्रकरणी संबंधित शाळेवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर (Education Officer Ravindra Katolkar) यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारला समितीची सभा पार पडली. यावेळी समिती सदस्य प्रकाश खापरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

काय आहे प्रकरण?

सक्सेस पॉईंट स्कूलच्या मुख्याध्यापिकेने एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याची 9500 रुपयांसाठी टिसी देण्याचे नाकारले होते. तेव्हा पालकांनी आपल्याकडे 7500 रुपये आहेत. ते ते भरतो टीसी द्या, अशी विनंती मुख्याध्यापिकेकडे केली. पण, मुख्याध्यापिकेने भीक मागा. पण, शाळेची फी भरा, असा सल्ला पालकांना दिला होता. त्यानंतर पालकांनी शाळेच्या पुढेच भीक मागितली. विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यांना मदत केली. त्यानंतर संबंधित पालकाने 9 हजार 500 रुपये भरले. तेव्हाकुठे विद्यार्थ्याची टीसी देण्यात आली होती.

शिक्षण समितीच्या बैठकीत उमटले पडसाद

भीक मागून शाळेची फीस भरल्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या गंभीर प्रकरणाचे पडसाद बुधवारच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उमटले. प्रकाश खापरे यांनी शिक्षणाधिकार्‍यांना यासंदर्भात विचारणा केली. सक्सेस पॉईंट शाळेवर काय कारवाई केली. शिक्षणाधिकारी काटोलकर म्हणाले, या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून चौकशी पूर्ण झाली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकाकडे शिफारस करणार आहे. या प्रकरणात संबंधित शाळेवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

मेडिकलच्या दंत महाविद्यालयात विद्रृप चेहऱ्यांवर होणार उपचार, नागपुरात इम्प्लांट किट्स लवकरच उपलब्ध

सिटी सर्व्हे विभागाची फेरफार अदालत सोमवारी, नागपूर शहरातील नागरिकांची कोणती कामे होणार?

Nagpur | महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यायामशाळेत काढला दम! मनपा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिले संकेत