नागपूर : भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप घेतला आहे. घटनात्मक पदावरील व्यक्तीनं संशय निर्माण होईल, असं वागू नये. आमचं ऐकूण घेतलं जात नाही. हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यानुसार मी अध्यक्षांकडं हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी वेळ मागत होतो. मी सातत्यानं ओरडत होतो. पण, ती हरकत ऐकूण घेतली जात नव्हती. नंतर संधी मिळाली तेव्हा अध्यक्षांना सांगितलं. आपल्या कामाबद्दल, आपल्या निर्णयाबद्दल, आपल्या कृतीबद्दल संशय निर्माण होईल, इतपत चुकीचं वागू नये, असं भास्कर जाधव म्हणाले.
भाजपमध्ये आलेले तुमची विचारधारा सोडून पक्षात आले नाहीत. कोणाच्या पाठीमागे केंद्रीय संस्था लावून ठेवल्याने लोक भाजपमध्ये आले. त्यामुळे सुडाचे राजकारण करू नका असेही भास्कर जाधव यांनी सांगितलं.
अफजल खानाचा मुद्दा उचलून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. पण तस झालं नाही. माझा बोलण्याचा विपर्यास करून वातावरण बिघडवण्याचा काम भाजप करणार म्हणत अफजल खान यांच्या कबरीच्या विषयाला धरून माध्यमासमोर खुलासा केला.
मला अफजल खानावर प्रेम नाही. अतिक्रमण काढलं याचा आनंद आहे. माझा आदर्श शिवछत्रपती शिवाजी महाराज आहेत. धार्मिक मुद्दे उपस्थित करून भाजप वातावरण बिघडवण्याचं काम करत आहे, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला.
राहुल शेवाळे यांच्यावर एनआयएने चौकशी करावी. 2014 पासून केंद्रात सरकार आले असताना नवाब मलिक दाऊदचे हस्तक असल्या लक्षात आलं नाही का? ज्या महिलेशी माझे संबंध जोडले जात आहे, ती दाऊदशी संबंधित आहे. असे म्हणतात तर त्यांनी त्या महिलेला पैसे का दिले असा प्रश्न विचारत राहुल शेवाळे यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असंही जाधव म्हणाले.