नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Shiv Sena MP Sanjay Raut) नुकताच नागपूर दौरा केली. त्यांच्या भेटीनंतर उपराजधानीतील शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात आलेत. नागपूर शिवसेनेत आता दोन महानगरप्रमुख असणार आहेत. किशोर कुमेरीया (Kishore Kumeria, Nagpur) यांची नागपूर महानगरप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळं आता प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरीया हे दोन महानगरप्रमुख असणार आहेत. शहर सहसंपर्क प्रमुखपदी मंगेश काशीकर यांची निवड करण्यात आली. तसेच विशाल बरबटे आणि प्रवीण बरडे यांनाही जबाबदारी देण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी नागपूर शिवसेनेत मोठे फेरबदल (Big changes in Nagpur Shiv Sena) करण्यात आलेत. नागपूर दौऱ्यादरम्यान संजय राऊत यांनी संघटनात्मक बदलाचं सुतोवाच केला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किशोर कुमेरीया यांची निवड करण्यात आल्याची माहिती आहे.
प्रमोद मानमोडे यांच्याकडे दक्षिण-पश्चिम, मध्य आणि पश्चिम नागपूरची महानगरप्रमुखपदाची जबाबदार असेल. तर किशोर कुमेरिया यांच्याकडे पूर्व, दक्षिण आणि उत्तर नागपूरची जबाबदारी असेल. मंगेश काशीकर हे सहसंपर्कप्रमुख असतील. दोन महानगर प्रमुखांव्यतिरिक्त तीन शहरप्रमुख नेमण्यात आले आहेत. नितीन तिवारी यांच्याकडे पश्चिम आणि उत्तर नागपूरची शहरप्रमुख पदाची जबाबदारी असेल. दीपक कापसे यांच्याकडे दक्षिण-पश्चिम व दक्षिण नागपूरची शहरप्रमुख पदाची जबाबदारी असेल, तर प्रवीण बरडे यांच्याकडे पूर्व आणि मध्य नागपूरची शहरप्रमुख पदाची जबाबदारी असेल. याशिवाय शहर संघटक म्हणून किशोर पराते यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
मध्यंतरी शिवसेनेत असंतोष पसरला होता. बाहेरून आलेल्यांना पद देण्यात आली. जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले गेले नाही, असा आरोप केला गेला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षातील काही कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन दोन महानगरप्रमुख करण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यात आल्यानं काही प्रमाणत शिवसेनाचा अंतर्गत कलह आता नक्कीच कमी होईल. याचा कितपत फायदा येत्या मनपा निवडणुकीत होतो, हे पाहावे लागले.