नागपूर : राजधानी दिल्लीत सीनजीचे दर 58 रुपये प्रतीलीटर आहे. नागपुरात मात्र, सीएनजी 120 रुपये प्रतिकिलो आहे. रविवारपूर्वी सीएनजीचे दर 100 रुपये प्रतीकिलो होते. त्यात तब्बल वीस रुपयांची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सीएनजी स्वस्त झाले. त्यामुळं पर्यावरणप्रेमी (environmentalists) लोकं सीएनजी, एलपीजीवर चालणारी वाहनं खरेदी करत होते. परंतु, या दरवाढीने त्यांना धक्काच बसला. शहरात सीएनजी, एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांमध्ये ऑटोंची संख्या मोठी आहे. ऑटोचालकांनी पेट्रोल, डिझेलची वाहनं कमी केली होती. पण, आता ते सीएनजीची दरवाढ पाहून पश्चाताप व्यक्त करत आहेत. नागपूर शहरात एलपीजीचे आठ-दहा पंप लावण्यात आले आहेत. गुजरातमधून एलपीजीची (import of LPG from Gujarat) आयात केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीचा तुटवडा (shortage of LPG in international market) आहे. त्यामुळं या किमती वाढल्याचे सांगितले जात आहे.
युक्रेन-रशियामधील युद्धामुळे तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली. त्यामुळं पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी शक्यता आहे. नागपुरात सीनएजीचा पुरवठा करणारे तीनच पंप असून ते रोमेट कंपनीचे आहेत. नागपुरात सीएनजीची पाईपलाईन नाही. त्यामुळे सरकारकडून अनुदान मिळत नाही. गुजरातमधून एलएनजी आणावा लागतो. त्यानंतर नागपुरात सीएनजीमध्ये त्याचे रुपांतर केले जाते. सीएनजी पंपावर आणून विक्री करावा लागतो. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम एलएनजीच्या दरवाढीवर झाला. गुजरातमधून नागपुरात एलएनजी आणण्याचा खर्चही वाढला. त्यामुळे सीएनजीचे दर वाढले असल्याचं सांगितलं जातं.
पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा वाढतील, या धडक्यात नागरिक आहेत. तेवढ्यात आता नागपुरात सीएनजीचे दर प्रचंड वाढले आहेत. पेट्रोलपेक्षाही सीनएजीचे दर वाढलेत. देशात सर्वात महाग सीएनजी नागपूर शहरात मिळत आहे. नागपुरात प्रतिकिलो सीनएनजीसाठी 120 रुपये मोजावे लागतात. दोन दिवसांत ही दरवाढ झाल्यानं सीनएजीवरील वाहनचालकांना धक्काच बसला.