नागपूर : नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या घराबाहेर आज दुपारी आंदोलन सुरू आहे. पण, तत्पूर्वी भाजपचे कार्यकर्ते गडकरी यांच्या घरासमोर दाखल झालेत. नितीन गडकरी यांच्या घरासमोर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. तर भाजपचे कार्यकर्ते (BJP workers) काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. बळजबरीचा वापर करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माघारी फिरविण्यात आले. काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिला. दुपारी बारा वाजता आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार काँग्रेसचे (Of Congress) कार्यकर्ते एकत्र आले. काँग्रेसचे कार्यकर्ते येतील, म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आधीच याठिकाणी पोहचले होते.
काँग्रेसचे कार्यकर्ते गडकरी यांच्या घराच्या दिशेने येताच भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. नाना पटोले मुर्दाबादच्या घोषणा कार्यकर्ते देत होते. काँग्रेसविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा कडकोड बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळपासूनच हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळं एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस असा हा संघर्ष दिसून येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते तुलनेत कमी आक्रमक पाहायला मिळाले. त्यांनी घोषणाबाजीही फारसी केली नाही. मात्र, झेंडे घेऊन ते गडकरी यांच्या घराच्या दिशेने कूच झालेत. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत काँग्रेसचे कार्यकर्ते कमी आहेत. भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आल्यानं त्यांच्यात बाचाबाची झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राने देशात कोरोना पसरविल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्राने कामगारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविले. त्यामुळं देशात कोरोना पसरला, असा आरोप मोदी यांनी संसदेत केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी भाजपच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिली. काल काँग्रेसकडून संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं. मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. याच आंदोलनानंतर नितीन गडकरी यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आलं.