नाना पटोलेंची मानसिकता इंग्रजांसारखी…; भाजपच्या बड्या नेत्याचा थेट हल्लाबोल

| Updated on: Jun 19, 2024 | 10:42 AM

Chandrashekhar Bawankule on Nana Patole : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी पटोले आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. तसंच महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलंय. वाचा सविस्तर...

नाना पटोलेंची मानसिकता इंग्रजांसारखी...; भाजपच्या बड्या नेत्याचा थेट हल्लाबोल
नाना पटोले
Image Credit source: Facebook
Follow us on

एका कार्यकर्त्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावर भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. नाना पटोले इतक्या खालच्या लेव्हलला गेले आहेत. शेतकऱ्यांना त्यांचे पाय धुवायला लावत आहे. या महाराष्ट्रात अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला. इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला आहे. त्या काळातील मानसिकता नाना पटोलेंमध्ये उतरली आहे. नाना पटोले यांनी पदाचा अपमान केलेला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

21 व्या शतकात चाललो, काय संदेश समाजाला चाललो, या देशात बघितले पाहिजे… पाय धुणार असो की धुवून घेणारा असो.. या पद्धतीचं वर्तण करणं शोभणार नाही. भविष्यात त्यांची जे वृत्ती आहे बुद्धीभेद जो झाला. ती दुरुस्त केली पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

“फडणवीस राज्यात भाजपचे प्रमुख नेते”

देवेंद्र फडणवीस हेच राज्यात भाजपचे प्रमुख नेते असणार आहेत. फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी, अशी विनंती केली आहे. त्यांनी ती विनंती मान्य केली आहे, असं आम्ही समजतो. केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केले असे आम्ही समजतो. महायुती सरकार लोकांच्यासाठी काम करतील यासाठी फडणवीस सरकारमध्ये असणे आवश्यक आहे. महायुतीच्या सर्वच नेत्याबद्दल मी असे म्हणेल, सर्वांनी चांगलं काम करायचे आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?

महायुतीचं सरकार आहे. भाजपचे नेता देवेंद्र फडणवीस आमचे आहे. महाविकास आघाडीत 5 मुख्यमंत्री झाले आहे. 6 लोकांचे बॅनर लागले. कोण मुख्यमंत्री बनणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. महायुतीचे मुख्यमंत्री कोण असेल यावर कुठली चर्चा आज नाही. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत. आज मुख्यमंत्री पदाची चर्चा करण्याची गरज नाही. आमचे प्रभारी तिन्ही पक्षाचे नेते मिळून ठरवतील, असं म्हणत बावनकुळे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलंय.

अजितदादांबद्दल आमच्याकडून कोणी बोलतही नाही. ज्यांनी कोणी बोललं असेल त्यांना लखलाभ. छगन भुजबळ यांनाच विचारावा लागेल. त्यांची नाराजी काय त्यांच्या भूमिकेबद्दल मी काही मत व्यक्त करणे हे योग्य नाही, असं म्हणत भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवर बावनकुळे यांनी भाष्य केलं.