नागपूर : वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजपने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र याच मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अमरावतीहून नागपुरात येत असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कार अडवण्याचा प्रयत्न नागपुरातील वाडी परिसरात केला. गाडी अडवल्यानंतर युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना वीजबिलासंदर्भात निवेदन देण्याचाही प्रयत्न केला.(bjp yuva morcha tried to stop the car of Ajit Pawar)
मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावतीहून बैठक आटोपून नागपूरला परत येत होते. यावेळी, अजित पवार यांचा ताफा वाडी परिसरात असल्याचे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील वाडी येथे अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच, यावेळी पवार यांचा ताफा आडवून त्यांना वाढीव वीजबिलासंदर्भात निवेदन देण्याचा प्रयत्नही युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी अजित पवार यांचा ताफा अडवल्यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर वाडी परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार, शिवसेना नेतृत्वावर बोलाल तर… https://t.co/PxgDCgCTPS @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @ChDadaPatil @Dev_Fadnavis #Pandharpur #Shivsena #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
इतर बातम्या :
अजित पवारांनी राष्ट्रवादीचा विश्वास गमावलाय- पडळकर
(bjp yuva morcha tried to stop the car of Ajit Pawar)