नागपूर : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला बाँबने उडविण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळं सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून ही धमकी दिली. त्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. झोन तीनचे डीसीपी गोरख भामरे यांनी सांगितलं की, पोलीस नियंत्रण कक्षात दुपारी एक वाजता फोन आला. महाल भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला उडविण्याची धमकी दिली. बाँब विरोधी पथक आणि डॉग स्काड टीमला पाचारण करण्यात आलं. आरएसएस मुख्यालय परिसरात तपासणी सुरू करण्यात आली. परंतु, काहीही संदिग्ध सापडलं नाही. पोलिसांनी सांगितलं की, पॅट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. पोलीस फोन करणाऱ्याची ओळख पटविण्यासाठी लोकेशन स्ट्रेस करत आहेत.
आरएसएस मुख्यालयाजवळ ड्रोन उडवायला बंदी आहे. संघ मुख्यालय परिसरात नेमही सुरक्षा असते. सीआरपीएफची एक तुकडी तैनात राहते. तसेच नागपूर पोलीस बाहेरील भागात सुरक्षा व्यवस्था पुरवते. या परिसरात व्हिडीओग्राफीला परवानगी नाही.
तसेच या परिसरात ड्रोन उडविण्यास परवानगी नाही. धमकीचा फोन आल्यानंतर पुन्हा आरएसएस मुख्यालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले. जवळपास पोलिसांच्या नजरा आहेत.
शनिवारी दुपारी एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला. आरएसएस मुख्यालयाला बाँबनं उडविण्याची धमकी देण्यात आली. मुख्यालय परिसरात दोन किलोमीटर ड्रोन उडविण्यात बंदी आहे. या परिसरात संदिग्ध वस्तू सापडल्यास त्या नष्ट केल्या जातात.