नागपूर : नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात गांजा, ड्रग्सच्या कारवाया केल्या जातात. अशाच वेगवेगळ्या 57 गुन्हयांत अमली पदार्थ, गांजा, ड्रग असा माल जप्त करण्यात आला होता. हा जप्त केलेला माल 411 किलो नष्ट करण्यात आला. त्याची बाजारात किंमत 1कोटी 75 लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नष्ट केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची (Senior Officers) एक समिती (Police Committee) काम करते. अमली पदार्थ विरोधात नागपुरात मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या. या कारवायांमध्ये गांजा, मोफेडील (Mofedil) सारख्या ड्रगचा सुद्धा समावेश आहे. हे सगळे ड्रग पकडल्यानंतर यातील काही श्याम्पलसाठी पाठविण्यात येत असते. मात्र सगळा मुद्देमाल मालखाण्यात जमा केला जातो. मात्र हा जास्त दिवस ठेवणे कठीण असते.
जप्त करण्यात आलेला गांजा, ड्रग्स यांचा साठा जास्त दिवस करता येत नाही. त्यामुळे त्याला नष्ट करावे लागते. यासाठी पोलिसांची एक कमिटी असते. त्या कमिटीत अनेक वरिष्ठ दर्जाचे अधिकारी असतात. यांच्या मार्गदर्शनात हा माल नष्ट करण्यात येतो. मागील काही काळात पोलिसांनी मोठ्या कारवाया केल्या. त्यातील 57 गुन्ह्यात पकडण्यात आलेला माल नष्ट करण्यात आला. 411 किलो वजनाचे गांजासह वेगवेगळे ड्रग यात होते. याची बाजारात किंमत 1 कोटी 75 लाख रुपये पेक्षा जास्त आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित यांनी दिली.
जप्त करण्यात आलेला माल मोठ्या प्रमाणात आहे. याचा अर्थ नागपुरात गांजा, ड्रग्सचा व्यवहार अवैधरित्या सुरू आहे. कारवाई करण्यात आली. तो सापडलेला माल आहे. हा सर्व माल नष्ट करण्यात आला. त्यावरून किती कारवाया करण्यात आल्या, हे लक्षात येते. गांजा असो की ड्रग याची नागपुरात किती मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळं आता यावर वेळीच लगाम घालण्याची खरी गरज आहे. अन्यथा युवा पिढी गांजा, ड्रग्स तस्कराच्या विळख्यात गेल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व अवैध व्यवसाय सुरू आहेत. याचा जबाबदार कोण असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.