मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यापासून त्यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. त्यांच्यामागे ईडी, सीबीआय तसेच तसेच आयटी विभागाची चौकशी लागलेली आहे. यातही भर म्हणून की काय आजदेखील देशमुख यांच्या मुंबई, आणि नागपूरवरील घरावर सीबीआयने पुन्हा एकदा धाड टाकली. सीबीआयची टीम देशमुख यांच्या मुंबईतील बंगल्यात तब्बल अडीच तास होती. विशेष म्हणजे या बंगल्यात सीबीआयच्या तीन सदस्यांनी तपास केला आहे. या अधिकाऱ्यांनी आपला तपास पूर्ण केला आहे. तसेच नागपुरातदेखील देशमुख यांच्या बंगल्यावर सीबीआयच्या टीमने आजच धाड टाकली. येथील अधिकाऱ्यांनीदेखील आपला तपास पूर्ण केला आहे. नागपुरात सकाळी आठ वाजल्यापासून अधिकाऱ्यांचा तपास सुरु होता.
अनिल देशमुख यांची आर्थिक गैरव्यवहार तसेच 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. याच आरोपाप्रकरणी त्यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्यासमोरील संकट अजूनही संपलेले नाही. त्यांच्या मुंबईतील बंगल्यावर आज पुन्हा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या धाडीदरम्यान अधिकाऱ्यांनी संपूर्ण बंगल्याची झडती घेतल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी तब्बल अडीच तास आपला तपास केला. या संपूर्ण तपासादरम्यान बाहेरच्या व्यक्तीला बंगल्यात येण्यास सक्त मनाई होती. सीबीआयच्या तीन सदस्यीय टीमने देशमुख यांच्या घरी तपास केला आहे. तब्बल अडीच तास तपास चालला असला तरी यामध्ये अधिकाऱ्यांच्या हातात नेमक्या कोणत्या गोष्टी सापडल्या किंवा अधिकाऱ्यांनी नेमका कशाचा तपास केला ? याची ठोस माहिती मिळू शकलेली नाही.
अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरातसुद्धा सीबीआयने धाड टाकली. येथे सकाळी आठ वाजेपासून तपास सुरु होता. देशमुख यांच्या घरातून दुपारी दोन वाजता दोन अधिकारी बाहेर पडले होते. त्यानंतर सुमारे साडे तीन वाजता बाकीचे अधिकारी देशमुख यांच्या घराच्या बाहेर पडले. यावेळी देशमुख यांच्या समर्थकांनी त्यांच्या जोरदार घोषणाबाजी केली.
देशमुखांशी संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडी
25 मे 2021 रोजी ईडीने सर्वात पहिली धाड टाकली होती. नागपूर येथील शंकर नगर, छावणी भाग आणि जाफर नगर या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिवाजी नगर भागातील हरेकृष्ण अपार्टमेंटमध्ये धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई प्रामुख्याने सागर भटेवार यांच्याशी संबंधित ठिकाणी करण्यात आली होती. सागर भतेवार हे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
या दिवशी ईडीने आठ ठिकाणी टाकल्या होत्या. या धाडी थेट अनिल देशमुख यांच्यावर होत्या. अनिल देशमुख यांचं वरळी सुखदा इमारतीतील घर, ज्ञानेश्वरी बंगला त्याच प्रमाणे त्यांच्या एका कार्यलयावर धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे सेक्रेटरी संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्याशी संबंधित ठिकाणीही धाडी टाकण्यात आल्या होत्या. याच कारवाईत पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईवेळी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
2 जुलै रोजी ईडीने तिसऱ्यांदा अॅक्शन घेतली. अनिल देशमुख यांना समन्स देण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, त्या दिवशी देशमुख सापडले नाहीत.
6 ऑगस्ट रोजी ईडीने चौथ्यांदा कारवाई केली. ईडीने देशमुख यांच्या ट्रस्ट कार्यलयासह इतर दोन ठिकाणी आज कारवाई केली आहे.
अनिल देशमुख यांच्या घर-कार्यालयांवर आता आयकर विभागाने धाडी टाकल्या. अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले.
इतर बातम्या :
Maharashtra Band : ठाण्यात उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण! व्हिडीओ उजेडात
Video | Jayant Patil | लखीमपूर घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आशिष मिश्राला अटक व्हायला हवी होती – जयंत पाटील#JayantPatil | #MaharashtraBand https://t.co/xqinx0h2bT
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021
(cbi raid on former home minister anil deshmukh nagpur and mumbai home completed)