आता विमानासारखी बस धावणार, खासियत काय?; नितीन गडकरी काय म्हणाले?

| Updated on: Oct 05, 2024 | 9:44 PM

नितीन गडकरींनी आगामी काळात सुरु होणाऱ्या एका नव्या बसबद्दलची माहिती दिली. या बसची काय खासियत असणार आहे, याबद्दलही त्यांनी भाष्य केले.

आता विमानासारखी बस धावणार, खासियत काय?; नितीन गडकरी काय म्हणाले?
नितीन गडकरी
Image Credit source: Facebook
Follow us on

Nitin Gadkari on New luxury Bus : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता लवकरच रस्त्यावर विमानासारखी बस धावताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या बसचे तिकटीही फार कमी असणार आहे, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली. ते नागपुरातील वाडी नगर परिषदच्या इमारतीचे लोकार्पण सोहळ्यावेळी बोलत होते.

नितीन गडकरी यांनी नागपुरातील वाडी येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. त्यानंतर नितीन गडकरींच्या हस्ते नागपूरच्या वाडी नगर परिषदच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नितीन गडकरींनी आगामी काळात सुरु होणाऱ्या एका नव्या बसबद्दलची माहिती दिली. या बसची काय खासियत असणार आहे, याबद्दलही त्यांनी भाष्य केले.

“रस्त्यावर अतिक्रमण करू नका”

आज वाडीचं चित्र पूर्णपणे बदललं आहे. मी इथे उभा होतो, तेव्हा इथे रोडवर ट्रकच साम्राज्य होतं. पण आता या उड्डाणपुलाचे चित्र बदललं आहे. दुसरं म्हणजे विद्यापीठापासून व्हेरायटी चौकापर्यंत उड्डाणपूल होत आहे. जर वाडी विकसित होत आहे, मग तुम्ही ते विकसित करायचं की नाही हे ठरावा. जर करायचं असेल तर रस्त्यावर अतिक्रमण करू नका. कोंबड्या, बकऱ्या रस्त्यावर बांधू नका. इथे एक अॅग्रो सेंटर बनवला जात आहे. त्या ठिकाणी वर्षभर कृषी संदर्भात संशोधन आणि कार्यक्रम होईल, असे नितीन गडकरींनी म्हटले.

“ही बस विमानांप्रमाणे असणार”

“आपण लवकरच वाडीमधून रिंगरोडने चालेल, अशी एक बस सुरु करणार आहोत. ही बस आधुनिक स्वरुपाची असेल. ही बस विमानांप्रमाणे असणार आहे. ही नवीन बस इलेक्ट्रीक असेल. ती एका चार्जिंगवर 50 किमी धावेल. त्यानतंर ती थांबेल. यानंतर परत चार्ज केल्यावर ती पुढे धावेल. ही देशातील एकमात्र बस असून जी वाडीमधून रिंगरोडने चालेल. यात सर्व सुविधा असतील. विशेष म्हणजे या बसचे तिकीट हे डिझेल बसपेक्षा कमी असेल”, असे नितीन गडकरींनी सांगितले.

“जर अतिक्रमण झालं तर…”

“देशातील पहिला बर्ड पार्क नागपुरात बनवण्यात आला आहे. दिव्यांग पार्क बनवला आहे. लोकांची ऑपरेशन केली. दिव्यांग व्यक्तींना पाय दिले. वाडीतील लोकांना अतिक्रमण करण्याची सवय आहे, पण मी ते खपवून घेत नाही. मी ऑर्डर दिले आहेत की जर अतिक्रमण झालं तर ते अतिक्रमण पाडून टाका. या भागात पिण्याच्या पाण्याची कमी आहे. मला 9 डिलिट पदव्या मिळाल्या आहेत. त्यातील 8 या कृषी क्षेत्रात आहे. त्यामुळे मी सांगतो धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा. चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा. या पद्धतीने तुम्ही पाणी बँक बनवा. तुमची समस्या दूर होईल”, असे नितीन गडकरी म्हणाले.

“मला कॉन्ट्रॅक्टरचे काम माहीत आहे. त्यांना मला ब्लॅक लिस्टड करायचे आहे आणि अनेक अधिकारी आहे. त्यांना सस्पेंड करायचे आहे. कारण मी कोणाचं काही माल, पाणी खात नाही त्यामुळे मी त्यांना रगडल्याशिवाय राहत नाही. पण इथे या कंपनीने चांगलं काम केलं त्यांनी मला कुठेही बोट ठेवण्याची जागा ठेवली नाही”, असेही नितीन गडकरींनी सांगितले.