अकोला: बेळगाव महापालिकेत 30 पेक्षाही अधिक जागा जिंकू, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या विधानाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. बेळगाव जिंकेल असा राऊत दावा करत असतील तर त्यांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. (chandrakant patil taunt sanjay raut over Belgaum Mahanagar Palika Election)
चंद्रकांत पाटील आज अकोल्यात आहेत. संजय राऊत बेळगाव जिंकेल हा दावा करत असतील तर त्यांचा अमेरिकाचाही अभ्यास असून शकतो. मला तिथली परिस्थिती माहीत नाही, असं पाटील म्हणाले.
कोकणात नारायण राणे समर्थकांना शिवसेनेने फोडले आहे. दोन नगरसेवकांनी समर्थकांसह काल शिवसेनेत प्रवेश केला. याकडे पाटील यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राणे समर्थक फोडल्याची मला माहिती नाही. पण असं झालं असेल तर नारायण राणे त्याला सक्षम आहेत, असं ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा संपणार की नाही? असा प्रश्न केला असता ओबीसींना आरक्षण देणं खूप सोपं आहे. पण या सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, असा आरोप त्यांनी केला. भाजपने परिवहन मंत्री अनिल परब यांचे नवे घोटाळे काढलेले नाहीत. जुनेच घोटाळे आहेत, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
बेळगाव महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षांकडून लढविली जात आहे. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल, आम आदमी पार्टी व एमआयएम या पक्षाचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूकीतील रंगत व चुरस वाढली आहे. आज होत असलेल्या निवडणूकीत बेळगाव दक्षिण आमदार अभय पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी बेळगावकरांना मतदानाचे आवाहन केले आहे. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर विराजमान होणार असून आम्ही 45 प्लस जागा जिंकू, असा दावा अभय पाटील यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज मीडियाशी बोलताना बेळगाव पालिकेवर शिवरायांचा भगवा फडणार असल्याचा दावा केला होता. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता. कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसं उत्साही वातावरण दिसतंय. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे. हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असं राऊत म्हणाले होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी 23 अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. उर्वरीत प्रभाग खुले सोडले आहेत. बेळगाव महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी 33 नगरसेवक निवडून येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती व भाजपने 40 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा दावा केला असून सोमवार 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीतूनच खरे चित्रं स्पष्ट होणार आहे. (chandrakant patil taunt sanjay raut over Belgaum Mahanagar Palika Election)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 September 2021 https://t.co/bgMLl72ffY #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 3, 2021
संबंधित बातम्या:
बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, 30 पेक्षा अधिक जागा जिंकू; संजय राऊतांना विश्वास
बेळगावात तब्बल 8 वर्षांनी मतदान, महापालिका निवडणुकीत मराठी अस्मिता पणाला!
बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवणारच, कोल्हापूरच्या शिवसैनिकांचं बेळगावकडे कूच
(chandrakant patil taunt sanjay raut over Belgaum Mahanagar Palika Election)