नागपूर : कोरोनाकाळात भाजपचे नगरसेवक छोटू भोयर यांनी चांगले काम केले होते. याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी छोटू भोयर यांचे कौतुक केले होते. पण, यावेळी विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं छोटू भोयर यांनी बंडखोरी केली. पाहुयात कोण आहेत छोटू भोयर आणि त्यांच्याबद्दलचे व्हायरल झालेले पोस्टर.
1987 पासून छोटू भोयर हे भाजपचं काम करीत आहेत. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी भाजपचं काम सुरू केलं होतं. छोटू भोयर हे गेल्या 3४ वर्षांपासून भाजपमध्ये आहेत. छोटू भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. 20 वर्षे ते नगरसेवक राहिलेत. नागपूर मनपाचे माजी उपमहापौर होते. छोटू भोयर यांनी स्थायी समिती अध्यक्षपद भूषविलंय. ते राष्ट्रीय स्वयंसेवक कट्टर स्वयंसेवक सुद्धा आहेत. नागपूर सुधार प्रन्यासचे ते विश्वस्तही होते.
छोटू भोयर यांचा सामाजिक सेवेत नेहमी पुढाकार राहिला. त्यांनी कोरोनाकाळात चांगलं काम केलं. जनतेची सेवा केली. या त्यांच्या कामाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे कौतुकही केले होते. त्यामुळं कुणावरही नाराजी नसल्याचं त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं.
आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते. पत्रकारांनी छोटू भोयर यांनी राजीनामा का दिला, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु, त्यावर दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. क्रीडा मंत्री सुनील केदार, पालकमंत्री नितीन राऊत यांनी छोटू भोयर यांना ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. छोटू भोयर हे आजपर्यंत भाजपशी एकनिष्ठ होते. आज त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.
2019 मध्ये छोटू भोयर यांचे पोस्टर व्हायरल झाले होते. त्या पोस्टरवर विनीत म्हणून सारू प्रिटर्सचे मालक महेंद्र कठाणे यांचं नाव होतं. 2018 मध्ये छोटू भोयर यांनी नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्तदान शिबिर घेतले होते. त्यासंदर्भात हे पोस्टर होते.
संबंधित बातम्या
छोटू भोयरांचा काँग्रेस प्रवेश : भाजपच्या पराभवाची नांदी – नितीन राऊत