नागपूर : राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधक (Corona Vaccine) लस दिली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला योग्य ती खरबदारी तसेच नियोजन आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार नागपूर (Nagour) जिल्ह्यात सकाळी 10 वाजतापासून 15 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस दिली जाईल. त्यासाठी नागपूर ग्रामीणमध्ये 47 तर शहरात 65 लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. नागपूर ग्रामीणमध्ये 47 केंद्र तर शहरी भागात 65 लसीकरण केंद्रावर लसीची सोय करण्यात आली आहे. तसेच नागपूर शहरात 33 शाळा-महाविद्यालयातदेखील लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, लहान मुलांच्या लसीकरणासाठी पालकांची संमती आवश्यक आहे.
♦ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
♦ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मिहान
♦ मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर
♦ प्रगती सभागृह दिघोरी
♦ मनपाचे आयसोलेशन हॉस्पिटल जाटतरोडी
♦ डॉ. आंबेडकर रुग्णालय कामठी रोड, सच्चिदानंद नगर उद्यान
♦ स्वा. प्रकाशराव दटके महाल रोगनिदान केंद्र,
♦ दीक्षाभूमी
♦ हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना
♦ के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
♦ पाचपावली सूतिकागृह
♦ मध्य रेल्वे रुग्णालय
इतर बातम्या :