नागपूर : राष्ट्रीय राजमार्गावरील सावनेर-धापेवाडा-गोंदखैरी या मार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. 4 लाईन असलेला हा मार्ग 28.88 किमीचा आहे. या रस्ता बांधकामासाठी 720 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नितीन गडकरींचं मूळ गाव हे धापेवाडा आहे. त्यामुळं गडकरी म्हणाले, या रस्ता बांधकामाचा सर्वात जास्त आनंद मला झाला आहे. कारण, या रस्त्यासोबत माझ्या लहानपणीच्या आठवणी जुळलेल्या आहेत. गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा करून दिला. ते म्हणाले, आमच्या लहानपणी या ठिकाणी रस्ते नव्हते. गाडी चिखलात फसायची. रात्रीच्या वेळी कळमेश्वर ते धापेवाडा बस राहत नव्हती. पायी चालावं लागायचं. लोकार्पणाप्रसंगी नितीन गडकरी म्हणाले, सोलर पॅनल असलेला मोठं शेड या ठिकाणी टाकायचं आहे. नदीच पाणी घाण का आहे, हा प्रश्न मला पडायचा. पण आता या ठिकाणी दोन शुद्धीकरण सेंटर उभारून ही चंद्रभागा नदी स्वच्छ करायची आहे. गावातील नदी आणि स्वच्छता हे फक्त सरकारच काम नाही. यात गावकऱ्यांनी सुद्धा आपली जबाबदारी पार पडायला पाहिजे, असंही गडकरी यांनी ठणकावून सांगितलं.
गडकरी म्हणाले, येथे मी चिंध्यांपासून कार्पेट बनविण्याचा कारखाना सुरु केला. ऑरगॅनिक भाज्या निर्माण करायला पाहिजे. आपल्या इथल्या भाज्या बाहेर जाव्यात, यासाठी फूड प्लाझा सुरू झाला पाहिजे. या रस्त्यावर 9 कोटी रुपये खर्च करून लाईट लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काम चांगल्या क्वालिटीचे झाले पाहिजे. नागपूर ते काटोलचं काम सुरू झालं. मात्र त्या ठिकाणी वनविभागाने काम करू दिलं नाही. 6 हजार 135 कोटी रुपयांची काम नागपूर जिल्ह्यात झाली आहेत. काही काम सुरू आहेत. नदी नाल्यांचं खोलीकरण करण आणि पाण्याचं नियोजन आवश्यक असल्याचं ते म्हणाले. मी धापेवाडा येथे राहायला आलो तर हा रस्ता माझ्यासाठी सुद्धा चांगल्या उपयोगाचा ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
लवकरच धापेवाडा येथे पुन्हा येऊन पूजा करेन. आज माझी पत्नी येऊ शकली नाही. ती परेदशात गेली आहे. सायबेरियाला माझ्या मुलाने ऑफिस (हॉटेल) सुरू केले. त्याच्या उद्घाटनाला गेली आहे. परत आल्यावर धापेवाडा येथे येऊन विठ्ठलाची पूजा करू. तसेच आदासाला येऊन गणपतीचे अथर्वशीर्षचे पठण करू, असंही गडकरींनी सांगितलं.