नितीन गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं, उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं थेट उत्तर

| Updated on: Aug 20, 2021 | 2:17 PM

राष्ट्रीय महामार्गांच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप करणारं पत्रं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. (cm uddhav thackeray)

नितीन गडकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्रं, उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं थेट उत्तर
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर आता 'सीसीटीव्ही'ची नजर
Follow us on

नागपूर: राष्ट्रीय महामार्गांच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप करणारं पत्रं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. या पत्रावरून मोठा गदारोळ उठला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. नितीनजी, तुमचं पत्रं बघितलं. जनतेच्या कामात मी कोणालाही आड येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडकरींना दिली आहे. (cm uddhav thackeray first time reaction on nitin gadkari’s letter)

नागपूर मेट्रोच्या सिताबर्डी ते कस्तुरचंद पार्क या मार्गाचे आणि फ्रीडम पार्कचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दृश्यप्रणालीद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडकरींच्या पत्रावर भाष्य केलं. नितीनजी तुमचं-आमचं नात थोडं वेगळं आहे. तुम्हीही कर्तव्य तत्पर आहात आणि आम्ही सुद्धा. तुमचं पत्र बघितलं. जनतेच्या कामाच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही तत्पर आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

विकास करताना राजकीय जोडे काढून येतो

नागपुरात अनोखं काही तरी आपण करतो आहोत. 20 मजली इमारत बनते आहे. स्पर्धा असली पाहिजे. विकासासाठी एकत्र येतो तेव्हा राजकीय जोडे काढून येतो. इतिहासाने ज्या कामाची नोंद घेतली त्याचं जतन करणं हे आपलं काम आहे. विकासाच्या मार्गात आपण स्पीड ब्रेकर येऊ देत नाही, असं सांगतानाच मेट्रोने नागपूरकरांचा प्रवास सुकर होईल. समृद्धी मार्गाने मोठा विकास होईल. प्रत्येकाला आपल्या शहराबद्दल तळमळ असते. विकास जलद गतीने होताना त्यात काही उणिवा राहणार नाही, याची दक्षता घेऊन काम करावं लागेल. आपण सगळे विकासाच्या सोबत आहोत अशी ग्वाही जनतेला देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.

देशातील पहिलं स्टेशन

यावेळी नितीन गडकरी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. मी जुन्या नागपुरात राहतो. त्या ठिकाणी मोठी विकास काम सुरू आहेत. त्यात काही अडचणी आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत करावी, असं गडकरी म्हणाले. एमएसआरडीसीसोबत माझं जूनं नात आहे. महाराष्ट्राचा विकास होत जावा. आम्हाला विकास हवा आहे. आम्हाला दिल्लीत महाराष्ट्राला मोठं दाखवायचं आहे. या ठिकाणी 20 मजली बिल्डिंग बनत आहे. 20 मजले असलेलं हे देशातील पहिले स्टेशन असेल. यात स्टेशनसह इतर बाबी सुद्धा राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी काम पुढे न्यावं

झिरो माईल स्टेशनचा आर्किटेक फ्रेंचचा आहे. फ्रीडम पार्कसोबत गार्डन सुद्धा बनविलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मेट्रोसाठी सगळ्या परवानग्या दिल्या. उद्धव ठाकरे यांनी आता त्याला पुढे नेलं पाहिजे, अशी अपेक्षाही गडकरींनी व्यक्त केली.

फडणवीस-गडकरींचं काम पुढे नेणार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव करत असताना झिरो माईल फ्रीडम पार्कचं उदघाटन होत आहे, याचा मोठा आनंद आहे. झिरो माईलचं देशाच्या इतिहासात मोठं महत्व आहे. फडणवीस यांच्या काळात गडकरी यांच्या माध्यमातून मेट्रोचं मोठं काम झालं. मेट्रोचं फार वेगाने काम झालं. त्यामुळे मेट्रो धावत आहे. वाहतूक व्यवस्था सक्षम झाली आहे. फडणवीस आणि गडकरी याना मी विश्वास देतो त्यांचं काम पालकमंत्री म्हणून मी पुढे नेईल, असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले. (cm uddhav thackeray first time reaction on nitin gadkari’s letter)

 

संबंधित बातम्या:

गडकरींच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल, पोलीस महासंचालकांना ‘हे’ आदेश

त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजी छत्रपतींचा मोठा गौप्यस्फोट

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर वाशिममध्ये दगडफेक, शिवसैनिकांवर आरोप

(cm uddhav thackeray first time reaction on nitin gadkari’s letter)