नागपूर: ऑगस्टच्या शेवटपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही. फक्त चर्चा झाली, असं सांगतानाच टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. (cm uddhav thackeray will take decision of relaxation in lockdown restrictions, says vijay wadettiwar)
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी चर्चा करताना ही माहिती दिली. देशातील दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही. निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. व्यापाऱ्यांच्या भावना योग्य आहेत. पण कोरोनाच्या बाबतीत ढिलाई महागात पडू शकतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकार सावध पावलं टाकत आहेत. व्यापाऱ्यांचा जीवही महत्त्वाचा आहे. व्यापाऱ्यांच्या भावनेशी सहमत राहून मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मेडिकलमध्ये प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. हे आरक्षण सहज मिळालं नाही. यावर पाठ थोपटणाऱ्यांची नियत साफ नव्हती. कोर्टाच्या आदेशामुळेच 27 टक्के जागा मिळाल्या आहेत. यावरून श्रेय घेणं योग्य नाही. मध्यप्रदेशात 14 टक्के जागा मिळतात. त्यावर काही बोलत नाहीत. ही बेईमानी आहे. मेडिकल प्रवेशात 27 टक्के जागा राखीव ठेवाव्यात ही मागणी आम्ही लावून धरली होती, असं त्यांनी सांगितलं. बजेटमध्ये ओबीसींच्या संख्येनुसार निधी मिळावा. यासह इतर ओबीसीच्या प्रश्नासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी देशातील ओबीसी नेत्यांची मोट बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ओबीसींचा इम्पेरीकल डेटा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सरकारची बाजू मांडणार आहेत. आम्ही कामाला लागलोय. म्हणूनच ही याचिका दाखल केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एमपीएससीच्या परीक्षेबाबत मागणी आली आहे. ती मागणी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे. तो निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. आज मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दौरा आहे. कॅबिनेटमध्ये चर्चा करूनच ते अंतिम निर्णय घेणार आहेत. हे देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत आहे, असं सांगतानाच पूरग्रस्त भागातील पाणी दुष्काळी भागात नेण्यावर आधी चर्चा झाली. पण आर्थिक भार लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतील. सरकार त्याबाबत नक्कीच विचार करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (cm uddhav thackeray will take decision of relaxation in lockdown restrictions, says vijay wadettiwar)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 2 August 2021 https://t.co/69iC03S1LQ #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2021
संबंधित बातम्या:
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी घट, अॅक्टिव्ह केसेस मात्र वाढत्याच
हिंमत असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल; संजय राऊतांचा इशारा
(cm uddhav thackeray will take decision of relaxation in lockdown restrictions, says vijay wadettiwar)