महाविकास आघाडीत पुन्हा धुसफुसीच्या चर्चा, नागपुरातील वज्रमूठ सभेला दोन दिवस बाकी असताना हे काय चाललंय?

| Updated on: Apr 14, 2023 | 5:20 PM

महाविकास आघाडीत एकीकडे नागपुरातील आगामी वज्रमूठ सभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. पण दुसरीकडे काही अनपेक्षित बातम्या देखील समोर येत आहे. नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना काही दिग्गज नेत्यांमध्ये नाराजी असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे नागपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीत पुन्हा धुसफुसीच्या चर्चा, नागपुरातील वज्रमूठ सभेला दोन दिवस बाकी असताना हे काय चाललंय?
maha vikas aghadi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. केंद्रात भाजपचा (BJP) पराभव करायचा असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र येणं जास्त गरजेचं आहे, अशी भावना विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालीय. त्यासाठी दिल्लीत काल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेले होते. तसेच राहुल गांधी देखील या बैठकीत होते. सर्वच विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम आता सुरु झालं आहे. असं असताना राज्यातील विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत वारंवार मतभेद आणि नाराजीनाट्य समोर येत आहे.

महाविकास आघाडीच्या नागपुरातील वज्रमूठ सभेवरुन नाराजी नाट्य सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या गोटात हे नाराजीनाट्य सुरु असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या पहिल्या वज्रमूठ सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गैरहजर राहिले होते. असं असताना आता काँग्रेसची जिथे ताकद आहे तिथे महाविकास आघाडीची सभा असताना काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

काँग्रेसमध्ये नेमकं नाराज कोण?

महाविकास आघाडीच्या नागपुरातील सभेवरुन काही काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसचे नागपुरातील बडे नेते आणि राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे नाराज असल्याचं वृत्त समोर येत आहे. वज्रमूठ सभेसाठी विश्वासात घेतलं नाही म्हणून नितीन राऊत नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकंच नाही तर वज्रमूठ सभेच्या आयोजनावरुन काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारी अलिप्त असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील काँग्रेस पक्षाची नागपुरात चांगली ताकद आहे. त्यामुळे ही सभा काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. नागपुरात पुढच्या दोन दिवसांनी म्हणजेच 16 एप्रिलला महाविकास आघाडीची दुसरी सभा आयोजित करण्यात आली आहे. याआधी छत्रपती संभाजीनगर शहरात पहिली सभा पार पडली होती. त्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता नागपुरात दुसरी सभा होतेय. पण या सभेवरुन नागपुरात नाराजीनाट्य रंगल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेस नेते नितीन राऊत हे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. नितीन राऊत हे नागपूरचे माजी पालकमंत्री आहेत. याशिवाय त्यांना काँग्रेस पक्षातील दलित चेहरा म्हणून ओळखलं जातं. त्यांचं काँग्रेस पक्षातील स्थान महत्त्वाचं आहे. पण या सभेच्या आयोजनात त्यांना विश्वसात घेतलं गेलं नाही म्हणून ते नाराज असल्याची माहिती मिळत आहे.

सभेची गेल्या 8 ते 15 दिवसांपासून नागपुरात सभेची तयारी सुरु आहे. पण या तयारीत नितीन राऊत कुठेच दिसत नाहीयत. याउलट नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात त्यांच्या मतदारसंघात एक वेगळी सभा घेतली. त्यामुळे ते येणार की नाही यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. त्यासोबतच काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलं म्हणूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.