नागपूर: राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी महाविकासआघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांतील यशाची पुनरावृत्ती करण्याचा चंग महाविकासआघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांनी बांधला आहे. त्यासाठी महाविकासआघाडीने विशेष रणनीती आखल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. (Mahaviaks Aghadi will try to win more Grampanchayat in Maharashtra says Vijay Wadettiwar )
वडेट्टीवार यांनी सोमवारी नागपुरात टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, 5000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींवर महाविकासआघाडी लक्ष केंद्रित करणार आहे. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये महाविकासआघाडी एकत्र निवडणूक लढवेल. जास्तीत जास्त ग्राम पंचायती जिंकण्याचा महाविकासआघाडीचा निर्धार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत सदस्यांपासून ते सरपंचपदासाठी किमान सातवी पास ही अट ठेवण्यात आली आहे. जो उमेदवार 1995 नंतर जन्मलेला असेल, आणि ज्याला सदस्य किंवा सरपंच म्हणून नियुक्त करायचं असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे. 24 डिसेंबरला हा जीआर जारी करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या:
ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश
(Mahaviaks Aghadi will try to win more Grampanchayat in Maharashtra says Vijay Wadettiwar )