ZP निवडणुकीत बाजी मारली, आता महानगपालिकेसाठी प्लॅन तयार, नागपुरात काँग्रेसमध्ये उत्साह संचारला

| Updated on: Oct 07, 2021 | 3:49 PM

काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून 15 वर्षांपासून भाजपची सत्ता असलेली नागपूर महापालिका काबिज करण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. तशी तयारीदेखील काँग्रेसने सुरु केलीय.

ZP निवडणुकीत बाजी मारली, आता महानगपालिकेसाठी प्लॅन तयार, नागपुरात काँग्रेसमध्ये उत्साह संचारला
nagpur municipal corporation
Follow us on

नागपूर : जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकीत नागपुरात काँग्रेसने चांगली कामगिरी केली. नागपूर जिल्हापरिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसने आपल्या जागा वाढवत विजयाचा षटकार लगावला. या यशामुळे आता काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून 15 वर्षांपासून भाजपची सत्ता असलेली नागपूर महापालिका काबीज करण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. तशी तयारीदेखील काँग्रेसने सुरु केलीय.

काँग्रेसची जिल्हा परिषदेत नऊ जागांवर बाजी 

नागपुरात पार पडलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसने चांगलं प्रदर्शन केलं. जिल्हा परिषदेमध्ये 16 पैकी 9 जागा जिंकल्या. तर पंचायत समितीमध्ये 31 पैकी 21 जागा जिंकून मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी आपल्या जागा वाढविल्या. या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी आपले लक्ष आता नागपूर महानगरपालिका निवडणुकीवर केंद्रित केले आहे.

काँग्रेस कार्यकर्ते, नेत्यांमध्ये उत्साह वाढला, मनपा निवडणूक जिंकणारच

गेल्या 15 वर्षांपासून नागपूर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. काँग्रेसमधील वाढती गटबाजी आणि केंद्रातील सत्ता गेल्यानंतर काँग्रेस मृतावस्थेत गेली होती. याच कारणामुळे मागील निवडणुकीत काँग्रेसला नागपूर महापालिकेत हार पत्करावी लागली होती. मात्र आता कार्यकर्ते आणि नेते दोघांचाही उत्साह वाढला आहे. कुठल्याही परिस्थितीत महापालिकेतून भाजपला हद्दपार करणारच, असा विश्वास काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत. त्याच्यासाठी मेगाप्लॅन तयार असल्याचंदेखील काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलं आहे.

भाजपनेही कंबर कसली 

नागपूर महापालिकेमध्ये भाजप 15 वर्षांपासून सत्तेत आहे. शहराच्या विकासात अनेक अडचणी आहेत. जनतासुद्धा यांना कंटाळली आहे. त्यामुळे यावेळी जनता काँग्रेससोबत असल्याचं काँग्रेसला वाटत आहे. तर एकीकडे काँग्रेसने निवडणूक जिंकण्याची तयारी दाखवली असली तरी दुसरीकडे भाजपनेदेखील चांगलाच जोर लावला आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीला अजून वेळ असला तरी राजकीय वातावरण आतापासून गरम व्हायला सुरुवात झाली आहे. जनता यावेळी परिवर्तन घडवेल की भाजपवर पुन्हा एकदा विश्वास दाखवेल हे वेळच सांगणार आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Temple Reopening Live Update | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात घटस्थापना संपन्न

संतापजनक ! डिलिव्हरी बॉयचं अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकलीसोबत विकृत कृत्य, मुंबई पुन्हा हादरली

बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याचा डीवायएसपींवर गोळीबार, नगरमध्ये थरार

(congress won zp election in nagpur now plan to win nagpur municipal corporation election)