Video Nagpur Shiv Sena | वीज बिल, दूषित पाणीपुरवठ्याने नागपूरकर त्रस्त; हे पाणी अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावं! शिवसेना कार्यकर्ते मनपावर धडकले

| Updated on: Apr 26, 2022 | 11:35 AM

नितीन आवले नागपुरातील शेंडेनगर, मानवतानगर परिसरातील झोपडपट्टी भागात राहतात. महिन्याला दहा हजार रुपये कमावणाऱ्या नितीन आवले यांना तब्बल एक लाख 21 हजार रुपये पाणी बिलं आलंय.

Video Nagpur Shiv Sena | वीज बिल, दूषित पाणीपुरवठ्याने नागपूरकर त्रस्त; हे पाणी अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावं! शिवसेना कार्यकर्ते मनपावर धडकले
नागपुरात लाखाच्या वर आलेलं वीजबील दाखविताना झोपडपट्टीतील नागरिक.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याची (Water Supply) मागणीही वाढलीय. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला नागपूर मनपा आयुक्तांनी दिलाय. पण नागपूर मनपाच्या ( Nagpur Municipal Corporation) नळातून येणारं पाणी पिणं तर सोडा, त्या पाण्याला आपण स्पर्शही करु शकत नाही. इतकं घाण पाणी नागपुरातील शेंडेनगर, मानवनगर, आवळेनगर, (Manavnagar, Awale Nagar) टेकानाका परिसरात महापालिकेच्या नळातून पुरवठा केलं जातोय. माणसं तर सोडा, जनावरंही पिणार नाही असं घाण पाणी नागपूरकरांना दिलं जातंय. त्यामुळे इतकं घाण पाणी मनपाच्या अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावं! असा संतप्त सवाल नागपूरकर मनपा अधिकाऱ्यांना विचारतायत.

कर्मचाऱ्यांना काढले कार्यालयाबाहेर

संजय राऊत यांनी सभा घेतल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. मनपा कार्यालयात जाऊन शिवसेना कार्यकर्त्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. त्यांचे पंखे, एसी बंद केली. त्यामुळं कर्मचाऱ्यांना बाहेर पडावे लागले. तुम्ही दूषित पाणी पिऊन दाखवा, असं आव्हानंच शिवसेना कार्यकर्त्यांनी दिलं.

पाहा व्हिडीओ

वीजबील लाखाच्या वर!

नागपूर महानगरपालिकेच्या पाणीबिलाने अनेक नागपूरकरांना शॅाक दिलाय. झोपडपट्टी भागात राहणाऱ्यांना लाखाच्या वर पाणीबिल पाठवल्याने अनेक जण शॅाकमध्ये आहेत. आधीच मनपाच्या नळाला पुरेसं पाणी येत नसल्याने लोक त्रस्त आहेत. त्यात आता लाखाच्या वर बिलं आल्याने लोकांना धक्का बसलाय. नितीन आवले नागपुरातील शेंडेनगर, मानवतानगर परिसरातील झोपडपट्टी भागात राहतात. महिन्याला दहा हजार रुपये कमावणाऱ्या नितीन आवले यांना तब्बल एक लाख 21 हजार रुपये पाणी बिलं आलंय.

पोट भरायचं की, वीजबील भरायचं?

आवळे यांच्या संपूर्ण परिवाराला धक्का बसलाय. हातावर पोट असल्याने आम्ही लेकरांचं पोट भरायचं की लाखाच्या वर आलेलं पाणीबिल भरायचं? हा सर्वात मोठा प्रश्न आवले परिवारासमोर आ वासून उभा आहे. फक्त आवले परिवारचं नाही तर, टेका नाका परिसरातील 50 ते 60 गरीब परिवाराला लाखाच्या वर पाणीबिल आल्याचं इथले माजी नगरसेवक सांगतात.

Sanjay Raut on Fadnavis: मेवाणींना अटक करून पुन्हा अटक हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण?; राऊतांचा फडणवीसांना सवाल

Hanuman Chalisa Row: राणा दाम्पत्याला आज दिलासा मिळणार? मुंबई सत्र न्यायालयाकडून बेल की जेल?

Raj Thackeray Aurangabad Sabha : औरंगाबादच्या सभेपूर्वी राज ठाकरेंना मोठा झटका, मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी