नागपूर : पंचेवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊची घटना. मोमिनपुऱ्यात समीर खान (Sameer Khan in Mominpur) याचा लहान भाऊ रिजवान राहतो. रिझवानने फोनच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर (WhatsApp States) समीरचा फोटो ठेवला होता. ते पाहून शाहबाज खान याने व्हॉटअॅपवर कमेंट केले. त्यावरून समीर याने शाहबाज खानला फोनवरून कमेंट बाबत विचारणा केली. शाहबाज खान याने ‘मै यहां का बादशाह हूं, मैं शादी के बारात में हूं’ असे बोलला. त्यानंतर समीर आणि अल्तमस अंसारी, अनवर अंसारी, आरिफ अंसारी, मोहम्मद कैफ अंसरी रा. संघर्षनगर हे व दोन विधीसंघर्ष बालकं हे शाहबास खानला मारहाण करण्यासाठी आले. त्यांनी यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतील खाना खजानासमोर दस्तक दिली. फिरोज खान याच्या मोठ्या भावाचा मुलगा अफताब खान याच्या लग्नाची वरात जात होती. आरोपींनी त्यांच्याकडे असलेली पिस्तूलने दोन राउंड (two rounds with pistol ) हवेत फायर केले. तर, फिरोज खानचा पुतण्या अशरफ खान याच्या पायावर चाकूने वार केला.
व्हॉट्सअप स्टेट्सवर चुकीचे का बोलला यावरून सात तरुणांनी वरातीत राडा केला. चुकीचे बोलणाऱ्यावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर वरातीत घुसले. वऱ्हाड्यांमध्ये दहशत निर्माण केली. एका अल्पवयीन तरुणाने चाकूने हल्ला केला. संतापलेल्या वऱ्हाड्यांनी एका हल्लेखोराला पकडले. त्याची चांगलीच धुलाई केली. यशोधरानगर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. अशरफला चाकूने मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दंगा, आर्म्स अॅक्ट यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला.