नागपूर : राज्य सरकारने 17 ॲागस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची लस कधी येणार? हा सर्वसामान्य पालकांचा प्रश्न आहे. मात्र विदयार्थी-पालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण लवकरच लहान मुलांची स्वदेशी लस येणार आहे. नागपुरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खडतरकर यांनी तसा विश्वास व्यक्त केला आहे. (Corona Vaccination For Child May be Start october November Dr Vasant khaltalkar)
“ऑक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत कोव्हॅक्सिन लस मुलांसाठी उपलब्ध होईल. लसीच्या चाचणीचा तीन महिन्यात येणाऱ्या रिपोर् बाबत आम्ही खूप आशावादी आहोत”, अशी आशा नागपुरात लहान मुलांवर कोव्हॅक्सिन कोरोना लसीची चाचणी करणारे डॅा. वसंत खळतकर यांनी व्यक्त केलीय.
नागपूरात 2 ते 18 वयोगटातील 525 मुलांवर लसीची चाचणी झालीय. या 525 मुलांना लसीचे दोन्ही डोस दिले. मुलांमध्ये कोणताही साईडइफेक्ट आढळून आलेला नाही. कोव्हॅक्सिनची ट्रायल यशस्वी झाली असून, आता अंतिम निष्कर्षाची प्रतिक्षा आहे, असंही बालरोगतज्ञ डॉ. वसंत खडतकर म्हणाले.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाला (Vaccination) सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी व्यक्त केला आहे.
खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशन आयोजित ‘इन्फोडोस’ या जुलै महिन्यात झालेल्या डिजिटल जनजागृती अभियानात ते बोलत होते. डॉ. पारेख यांच्या या विधानाने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘इन्फोडोस’ या जनजागृती अभियानाच्या दुसऱ्या सत्रात ‘कोरोनाकाळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी’ या विषयावर डॉ. बकुळ पारेख यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधला.
“आत्तापर्यंत आपण 18 वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण करत आहोत. मात्र तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होऊ शकणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जगभरात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी चाचण्या सुरू आहेत. अमेरिकेत फायझर कंपनीने 12 वर्षांवरील मुलांवर कोरोना लसीकरणाच्या चाचण्यांना सुरुवात केली आहे. भारतात देखील, बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या बालकांवर सुरू आहेत. या चाचण्यांचा सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लहान मुलांचे कोरोना लसीकरण लवकरात लवकर करण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरु आहे”, असं ते म्हणाले.
(Corona Vaccination For Child May be Start october November Dr Vasant khaltalkar)
हे ही वाचा :
येत्या 5 महिन्यात लहान मुलांचं लसीकरण, कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होण्याची शक्यता!