नागपूर: पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्यात आली आहे. लहान मुलांच्या स्क्रिनिंगमध्ये 12 मुलांमध्ये अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे या मुलांना कोरोना होऊन गेला तरी त्यांना कळलं नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे कोरोनाची अधिक भीती बाळगण्याची गरज नसल्याचं सांगितलं जात आहे. (Covaxin trial: antibody found in kids aged 6 to 12 in nagpur)
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या लहान मुलांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 6 ते 12 या वयोगटातील मुलांना लस देण्यास आजपासून सुरुवात झाली. नागपुरातील मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात लहान मुलांसाठी ही क्लिनिकल ट्रायल सुरू होती. त्यावेळी 6 ते 12 या वयोगटातील 35 पैकी 12 मुलांमध्ये अँटिबॉडीज पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. घरात कोणतीही कोरोनाची पार्श्वभूमी नसताना 12 मुलांमध्ये अँटिबॉडीज पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यावरून या मुलांना न कळत कोरोना होऊन गेल्याचं स्पष्ट होत आहे.
6 जून रोजी पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटातील 40 मुलांना लस देण्यात आली होती. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणानंतर कोणावरही कसलेही दुष्परिणाम झाले नव्हते. त्यामुळे आता 6 ते 12 वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आज 20 मुलांना लस देण्यात येत आहे. काही दिवसांनी 2 ते 6 या वयोगटासाठी लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटानंतर देशभरात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना राहील, असा अंदाजही वर्तवला जात आहे. परंतु मुलांसाठी कोरोना लसीचे काम देखील खूप वेगाने सुरू आहे. 6 ते 12 वर्षाच्या मुलांची निवड यात करण्यात आली असून RTPCR रिपोर्ट आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. भारत बायोटेकच्या लस चाचणी प्रक्रियेअंतर्गत लहानमुलांना लस द्यायला सुरुवात झाली असून नागपूर येथील खाजगी रुग्णालयात याचा प्रारंभ झाला. 110 मुले या लसीसाठी स्वयंसेवक म्हणून हजर झाली होती. त्यापैकी 35 मुलांची छाननी करण्यात आली. त्यांची रक्त तपासणी, आरटी पीसीआर चाचणी घेण्यात आली. ज्या मुलांमध्ये अँटिबॉडी विकसित झाले नाहीत अश्या 25 मुलांचा यात समावेश केला गेला. 12 ते 18 वयोगटाच्या मुलांच्या चाचणी नंतर पालकांमध्ये उत्साह असून आजपासून सुरू झालेल्या 6 ते 12 वर्षाच्या मुलांचे पालक देखील सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया डॉ. वसंत खळतकर यांनी दिली आहे. (Covaxin trial: antibody found in kids aged 6 to 12 in nagpur)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 16 June 2021 https://t.co/xhBQ2fPp79 #MahaFast #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra Coronavirus LIVE Update : भिवंडी शहरात 4 तर ग्रामीण भागात 50 नवे कोरोनाबाधित
(Covaxin trial: antibody found in kids aged 6 to 12 in nagpur)