बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आणखीन घटना समोर येत आहे. या वाढत्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील लाडकील बहीण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना अत्याचार करणाऱ्यांना आता वेळ पडली फाशीची शिक्षा देणार असल्याचं म्हटलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
समाजाला कीड लागली आहे. परिवारातील जी मुले आहेत त्यांना समजावं लागणार आहे की या आपल्या भगिणी आहेत. माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं ही शिकवण त्यांना आपण दिली पाहिजे. महिलांप्रती आदर करणं गरजेचं आहे, जे महिलांचा अनादर आणि अपराध करतील त्यांना मोकळं सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर शिक्षा जर आवश्यकता पडली तर फाशीची शिक्षा देण्याचा माणस आमच्या सरकारने केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमच्या बहीणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचवले. आम्ही लाडकी बहीण योजना आणली आम्ही काय चूक केली का? गुलाबी रिक्षा योजना, शुभमंगल योजना, लेक लाडकी योजना, शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये पिक विम्याची योजना सुरू केली. मात्र काँग्रेसचे नेत्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. योजनांवर पैसा जास्त खर्च होत आहे त्यामुळे त्या बंद करा. पण या राखीची आम्हाला आण आहे, आम्ही काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
मोदी सांगतात, महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेत आणणार नाही तोपर्यंत भारत विकसित होणार नाही. मोदीजींनी अनेक योजना आणल्या त्यानंतर आम्हीही महिलांसाठी योजना आणल्या. तोट्यात असलेली एसटी फायद्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं.