नागपूर : आयआयएम नागपूर प्लेसमेंट आणि इंटर्नशिपसाठी खूप चांगलं समजलं जातं. IIM NAGPUR ला स्थान 2021 मध्ये राष्ट्रीय इंस्टिट्युशन रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (National Institution Ranking Framework-NIRE) 2021 ला 50.62 स्कोर वरून 40 वी रँक मिळाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Indian Institute of Management) म्हणजे आयआयएम नागपूरच्या कॅम्पसचे लोकार्पण केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan), देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि महाराष्ट्राचे विधान परिषद सदस्य सुभाष देसाई उपस्थित होते. राष्ट्रपती कोविंद यांनी दहेगाव येथील मिहान परिसरातील नागपुरातल्या आयआयएम कॅम्पसचे लोकार्पण केलं. 600 विद्यार्थी शिकू शकतील, अशी क्षमता या परिसराची आहे. 132 एकरचा हा परिसर आहे. आतून तसेच बाहेरून खास डिझाईन करण्यात आलंय.
आयआयएम नागपूरची स्थापना 2015 ला आयआयएम अहमदाबादसोबत काम करणारी संस्था म्हणून करण्यात आली. एमबीएसोबत व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण दिलं जातं. आयआयएमनं आपला पहिला पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम 23 जुलै 2015 ला सुरू केला होता. आयआयएम नागपूरच्या कॅम्पसमध्ये आर्ट क्लासेस, आयटी इनफ्रास्ट्रक्चर तसेच अत्याधुनिक संसाधन आहेत. लायब्ररी, प्रशासकीय विभाग, विद्यार्थ्यांचं वसतिगृह, स्पोर्ट्स काम्प्लेक्स तसेच कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था आहे.
प्लेसमेंटच्या बाबतीत आयआयएम कॉलेज सर्वात चांगलं आहे. आयआयएम नागपूरचा प्लेसमेंट रेकॉर्ड खूप चांगला समजला जातो. कॉलेजजवळ 100 टक्के प्लेसमेंटचा रेकॉर्ड आहे. याचा प्लस पॉइंट हे आहे की, व्यवस्थापन आणि कॉलेज प्लेसमेंट कमिटी मार्केट लीडरसोबत मिळून काम करतात. कॉलेजचा वार्षिक पॅकेज जवळपास 27 लाख रुपये आणि साधारण पॅकेज 10 लाख रुपये आहे. तसेच इथं शिकणाऱ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळते. त्यात स्कील डेव्हलपमेंट शिकायला मिळते.