नागपूरः गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या बुलंद तोफा समजल्या जाणाऱ्या संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाला हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही घेरले आहे. जो पक्ष हिंदुत्वावादी म्हणवून घेतो, त्याच पक्षाकडून वारकऱ्यांवर आक्षेपार्ह बोलले जात असल्याची टीका ठाकरे गटावर आणि सुषमा अंधारे यांच्यावर करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना त्यांनी ठाकरे गटावरही सडकून टीका केली आहे. एकाच वेळी त्यांनी हिदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून त्याच वेळी वारकऱ्यांची बाजू उचलून धरत त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसापूर्वी वारकऱ्यांच्या भावना दुखवतील अशी वक्तव्य केली होती. त्याप्रकरणावरून वारकरी पंथाकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.
मात्र त्यानंतर सुषमा अंधारे यांनी माफीही मागितली होती. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा वाद उखरून काढत सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
त्यांच्याबरोबरच ठाकरे गटाचे हिंदुत्ववादही काढला जात असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात दोन पक्षी मारले असल्याचे बोलले जात आहे.ठाकरे
गटावर टीका करताना त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे वारकऱ्यांवर मात्र आक्षेपार्ह बोलतात अशी टीका करण्यात आली आहे.
त्यामुळे एकीकडे बुलंद तोफ समजल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांना कोंडीत पकडण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असल्याचे दिसून येत आहे.