नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासून विरोधकांनी सीमाप्रश्नावर जोरदार आवाज उठविणार असल्याचा इशारा सरकारला दिला होता. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून रोज सीमावादा सवाल उपस्थित करूनही सरकारकडून दुर्लक्षे केले जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना आमदार रवी राणा यांच्याकडून सीमावादाबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहेत. तर याचवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
आमदार रवी राणा यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी उद्धव ठाकरे हे बेळगावला सीमावादासाठी किती वेळा गेले माहिती नाही असा सवाल उपस्थित करून त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूरला आले आहेत ते काही सीमावादासाठी नाही तर आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षिततेसाठी ते नागपूरात आल्याची टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.
आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविषयी मात्र त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सीमाबांधवांकडे बारकाव्याने लक्ष आहे.
सीमावाद सोडवण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनही हा सीमावाद सोडवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे तर, केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबरोबरच बेळगावातील कोणत्याही नागरिकांवर नाही असा विश्वासही आमदार रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक प्रशासनाकडून वारंवार अन्याय केला जात आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग केंद्र शासित करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी त्यांच्यावर टीका करत, उद्धव ठाकरे यांनी ही मागणी करणे चुकीचे असल्याचे मतही त्यानी यावेळी व्यक्त केले.