आज नागपुरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा ‘मंत्रा’ भाजप कार्यकर्त्यांना दिला. आपले कार्यकर्ते चांगलं काम करतात. मात्र विरोधकांप्रमाणे मार्केटिंग करत नाहीत. आता आपली काम तुम्ही लोकांना दाखवा. हे लोक एवढे हुशार आहेत. ते निवडणुकी पुरत्या घोषणा करतात आणि मार्केटिंग करतात. त्यामुळे तुम्ही आपलं मार्केटिंग करा. आपलं काम जनतेला दाखवा. अनेक कार्यकर्ते थकले होते. चालते तर चालू द्या… असं करत होते. अनेक चमकेश कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. ते कॅमेरा पाहून काम करतात ते आता विसरा… असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सावनेरमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे. जिल्हा बँक घोटाळा 22 वर्ष पूर्वी झाला. त्यांना कोर्टाने शिक्षा दिली. पण ते म्हणतात भाजपवाले आमच्या मागे लागले… भाजप कोर्टाला सांगते का यांची वसुंली करा यांना सजा द्या…?, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुनील केदार यांचं नाव न घेता टीका केली आहे.
जिल्हा बँक जिवंत असती तर माझ्या शेतकऱ्यांना इतका त्रास सहन करावा लागला नसता. पण ते लोक असं दाखवतात त्यांनी खूप मोठी मर्दुमकी दाखवली… अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी बनवलेला सिपी आरोप करतो. सीबीआय केस दाखल करतात. कोर्टाने जेलमध्ये पाठवलं. पण आज ते म्हणतात फडणवीस माझ्यावर कारवाई करायला सांगतात… माझं नाव सध्या फार लाडकं झालं जो तो घेतो…, असं म्हणत देवेंद्र फडणणवीस यांनी अनिल देशमुखांना टोला लगावला.
यांच्यावर बोलणं मी माझा कमी पण समजतो. मात्र नागपूर जिल्ह्यातील लोकांना माहीत असावं म्हणून मी बोलावं. त्यांना माहीत आहे. यांच्यावर अटॅक केला की यांना कमी करता येऊ शकतं. घेरता येऊ शकतं. म्हणून यांची लोक सकाळी उठले की भोंगे वाजवतात. मात्र देवेंद्र फडणवीसची ताकत ही जनता आहे. माझे कवच कुंडल जनता आहे. अभिमन्यूला चक्रव्युव्हमध्ये जात आलं. पण बाहेर येत आलं नव्हतं. मात्र मी तसा नाही मी चक्राव्ह्युव्ह भेदून बाहेर येणार आहे. कारण माझी ताकत माझी जनता आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.