गजानन उमाटे, टीव्ही ९, नागपूर : समृद्धीसारखा नागपूर ते गोवा महामार्ग तयार करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. रस्ते विकासाचा प्लानचं त्यांनी सांगितला. नागपूर ते गोवा हा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला जोडून जाईल. कनेक्टिव्हीटी वाढवायची आहे. राज्यातील कुठल्याही भागात 8 ते 10 तास पोहचता येईल, असे रस्ते तयार करायचे आहेत, असंही ते म्हणाले.
नवीन सरकार हे फायलींवर बसणारे नाही. हे काम करणारे सरकार आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. दोन सव्वादोन वर्षच आमच्याकडे आहेत. त्यामुळे फास्ट चांगला विकास करायचा आहे. आम्हाला 20-20 ची मॅच खेळायची आहे, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी नरेडको विदर्भला सरकारच्या वतीनं पूर्ण सहकार्य मिळेल. बिल्डर्ससोबत सामान्य माणसांचं हित जपणारी नरेडको ही संघटना आहे. व्यवसायास समोर असलेल्या अडचणी मांडा आम्ही त्या सोडऊ. मी मुख्यमंत्री असताना देशातलं पहिलं रेरा आपण महाराष्ट्रात सुरु केला, असंही त्यांनी सांगितलं.
काही बिल्डर्समुळे ही कम्युनिटी बदनाम झाली होती. पण रेरा कायद्यामुळे विश्वासार्हता तयार झाली. रेरा कायदा देशात सर्वाधिक यशस्वी महाराष्ट्राने केला. एक रुपयाचा भ्रष्टाचार न करता मी मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्व मोठ्या शहरांचा विकासाचा प्लान तयार केला.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भाचा चेहरा बदलेल. समृद्धी महामार्ग नेक्स्ट इकोनॅामीकल कॅारिडॅार असणार आहे. स्वातंत्र्यापासून ते 2015 पर्यंत मुंबई एमएमआर रिजनमध्ये तीन लाख कोटी रुपये इन्फ्रास्टक्चरवर खर्च केले. तेवढेच मी पाच वर्षांत केले, असल्याची माहिती त्यांनी दिली.