नागपूरः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जतमधील काही गावांवर व सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूरवर दावा केला होता. त्यानंतर सीमावादाला नव्याने ठिणगी पडली होती. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातील वाहनं कर्नाटकात गेल्यानंतर तोडफोड आणि नागरिकांना मारहाणही करण्यात आली.
तर आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक प्रशासनाकडून परवानगी नाकारून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रचंड उफाळून आला होता. त्यांच्या या एका ट्विटमुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या महाराष्ट्रातील वाहनांची कन्नडिगांनी तोडफोड केली होती.
त्यानंतर कर्नाटक सरकारचे होणारे हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यालाही परवानगी नाकारली गेली.
त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्मई यांच्या बरोबर चर्चा करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांनी दिला आहे.
बेळगाव प्रशासनाकडून लोकशाही मार्गाने कर्नाटक प्रशासनाविरोधात आंदोलन करणाऱ्या बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या कार्यकर्त्यांना सोडण्याची विनंतीही करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. बेळगावमधील ज्या ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना सोडण्याची मागणी मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडे केली जाणार आहे.
सीमावादावरून विरोधकांनी जोरदार आवाज उठवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही असा विश्वास दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता शब्द दिल्यामुळे आता कर्नाटक प्रशासन काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.